Home सामाजिक आयोडिनविषयीची जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर ‘टाटा सॉल्ट’चा भर

आयोडिनविषयीची जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर ‘टाटा सॉल्ट’चा भर

14 second read
0
0
39

no images were found

आयोडिनविषयीची जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर ‘टाटा सॉल्ट’चा भर

 

कोल्हापूर, : देशभरातील लहान मुलांमध्ये असलेली आयोडीनची कमतरता दूर करण्याची कटिबद्धता टाटा सॉल्ट या ब्रॅंडने या जागतिक आयोडीन कमतरता दिनानिमित्त व्यक्त केली आहे. टाटा सॉल्ट हा आयोडीनयुक्त मीठ बनविणारा भारतातील अग्रणी व या बाजारपेठेतील सर्वात मोठा ब्रॅंड आहे. आयोडीनयुक्त मिठाचा पहिला राष्ट्रीय ब्रॅंड अशी ओळख असलेला टाटा सॉल्ट आयोडीनबद्दल जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आयोडीन हा मानसिक विकासासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वपूर्ण सूक्ष्म पोषक घटक आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये त्याचे मोठेच महत्त्व असते. 

      ‘टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स’च्या पॅकेज्ड फूड्स (भारत) विभागाच्या प्रमुख दीपिका भान म्हणाल्या, “आयोडीनच्या कमतरतेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आयोडीनयुक्त मिठाच्या रुपात सर्वांना योग्य प्रमाणात आयोडीन पुरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. लाखो भारतीय कुटुंबे ज्यावर अवलंबून आहेत, अशा दर्जाच्या उत्पादनाचे वितरण करून आमच्या ब्रँडने अनेक वर्षांपासून या कुटुंबांचा विश्वास संपादन केला आहे. नावीन्यपूर्ण आणि सर्वांगीण कल्याणास समर्थन देणाऱ्या उपायांबद्दल आम्ही समर्पित असतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्य़ा विकारांबद्दल जागरुकता वाढवण्याचे महत्त्व आम्ही या जागतिक आयोडीन कमतरता दिनानिमित्त अधोरेखित करीत आहोत. समाजात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी आणि सर्वांना निरोगी भविष्य मिळावे याकरीता योगदान देण्यासाठी आम्ही प्रत्येकाला आमच्या मिशनमध्ये सामील होण्यास आमंत्रित करतो.”

      अनेक विकसनशील देशांप्रमाणे भारतातही ‘लपलेली भूक’ नावाची एक आरोग्य समस्या आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये ही समस्या मोठी आहे. आयोडीनसारख्या महत्त्वाच्या पोषक घटकाच्या कमतरतेमुळे हे घडते. हे पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वाचे असतात. मुलांची सामान्य वाढ, थायरॉईडचे कार्य आणि मेंदूचा विकास यांसाठी आयोडीन विशेषकरून आवश्यक आहे. आयोडीनच्या संदर्भात २०१८-१९ मध्ये भारतात एक सर्वेक्षण झाले होते. त्यात असे दिसून आले, की केवळ ५५ टक्के लोकसंख्येला आयोडीनयुक्त मिठाचे फायदे माहीत आहेत. ४५ टक्के जनता त्याविषयी अजूनही अनभिज्ञच आहे. याच लोकसंख्येच्या कल्याणासाठी, आयोडीनच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी टाटा सॉल्ट कटिबद्ध आहे.

       आयोडीनची कमतरता दूर करून आणि आयोडीनयुक्त मीठ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल याची खात्री करून राष्ट्रीय निरोगीपणाला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेत टाटा सॉल्ट गुंतलेला आहे. आपल्या देशातील मुलांमध्ये बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व (आयडीडी) निर्माण होऊ नये, यासाठी कुटुंबांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देण्याचे प्रयत्न टाटा सॉल्ट नेहमीच करीत असतो. या मिठाच्या एकेक कणाने निरोगी व अधिक सामर्थ्यशील भारत घडत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…