Home स्पोर्ट्स एनआयटीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड… जम्परोप स्पर्धेत नेत्रदीपक यश

एनआयटीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड… जम्परोप स्पर्धेत नेत्रदीपक यश

1 second read
0
2
90

no images were found

एनआयटीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड…

जम्परोप स्पर्धेत नेत्रदीपक यश

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दोन विद्यार्थ्यांची जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांनी नंदुरबार येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय कनिष्ठ जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेत (छत्रपती चषक) नेत्रदीपक यश मिळवले. कु. अनन्या गिरीगोसावी हिने 30 सेकंद स्पीड प्रकारात सुवर्णपदक व फ्री स्टाईलमध्ये ब्रॉन्झ पदक आणि कु. आराध्य गिरीगोसावी याने 3 मीटर इंडोरन्स प्रकारात ब्रॉन्झ पदक पटकावले. राज्यातील २५० खेळाडूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा ५ व ६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र जम्परोप संघटनेतर्फे नंदुरबार येथे भरवली होती. यशस्वी खेळाडूंना विद्वेश मोरे यांचे प्रशिक्षण तर चेअरमन डॉ. के. जी. पाटील आणि प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांचे प्रोत्साहन लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…