
no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल‘मध्ये पुष्पाला कोर्टातील केस हरण्यासोबत स्वत:चे घर गमावण्याचा धोका!
सोनी सबवरील मालिका ‘पुष्पा इम्पॉसिबल’ अत्यंत रोमांचक कथानक आणि अनपेक्षित ट्विस्ट्स व वळणांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. बपुद्रा पुष्पाला (करूणा पांडे) तिच्या घराबाहेर काढतो आणि तिच्यावर बेकायदेशीरपणे व्यवसाय चालवण्याचा आरोप करतो. समस्यांमध्ये अधिक वाढ होत राहते आणि ती आता तिचे घर गमावण्याच्या टप्प्यावर असून कायदेशीर लढा देत आहे, तसेच तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. बपुद्रा चाळीमधील रहिवाशी त्यांच्यापरीने पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करत पुष्पाला बपुद्राविरोधातील तिच्या कायदेशीर लढ्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात. पुष्पाने सध्या भाडे करार शोधण्यावर भर दिला आहे, ज्यामुळे बपुद्राचे आरोप फेटाळले जातील. सुशीलाला कागदपत्रे सापडतात आणि बपुद्रा नसताना पुष्पाला कागदपत्रे देते. बपुद्राला हे सत्य कळते आणि त्याला फसवल्याबद्दल सुशीलावर रागावतो.