no images were found
फ्लिपकार्ट आणि स्वदेस फाऊंडेशन एकत्रितपणे महाराष्ट्रातील रायगड येथील युवकांचा करणार विकास
बंगळुरू – फ्लिपकार्ट फाऊंडेशन ही संस्था फ्लिपकार्ट ग्रुपमधील सेवाभावी संस्था आहे. फ्लिपकार्ट फाऊंडेशन या संस्थेने स्वदेश फाऊंडेशन या ग्रामविकास क्षेत्रातील आघाडीच्या संस्थेबरोबर भागीदारी केली आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणांचा विकास करण्यासाठी एक उपक्रम तयार केला आहे. रूरल प्रोस्पेरिटी :एम्पॉवरिंग रूरल युथ थ्रू टार्गेटेड स्किल डेव्हलपमेंट फॉर सस्टेनेबल इनकम्स,असं या उपक्रमाचं नाव आहे.त्याअंतर्गत २०० तरुणांचा कौशल्यविकास करून त्यांचं जीवनमान उंचावलं जाणार आहे. त्यामुळे या तरुणांच्या घराचं उत्पन्न वर्षाला ८०,००० ने वाढवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या भागातील १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ज्यांना इमारतीचं बांधकाम आणि रंगरंगोटी शिकायची आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा ४५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे या भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून रोजगारक्षमता देखील वाढेल. त्याचा जवळजवळ ६६० कुटुंबीयांना फायदा होणार आहे. त्यामुळे एकूण ८६० जणांना फायदा होणार आहे. सध्या बाजारपेठेत आणि नोकरीच्या क्षेत्रातल्या गरजांशी हा उपक्रम सुसंगत असेल. युवकांमध्ये असलेली बेरोजरीच्या समस्येचा सामना करून योग्य करिअर करण्यासाठी त्यांना सुयोग्य कौशल्य प्रदान करणं आणि वंचित घटकातील लोकांना समान संधी देऊन सर्वसमावेशक धोरण अवलंबणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सतत नवनवीन काहीतरी शिकण्यावर या उपक्रमाचा भर आहे. त्यामुळे उपक्रमात भाग घेणारे तरुण करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी तयार होतील आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक ते बदल घडवून आणतील.या उपक्रमात काही महत्त्वाच्या संकल्पना अंतर्भूत आहेत- तरुणांना प्रेरणा देणं आणि त्यांचा सहभाग सुनिश्चित करणं, समुपदेशन आणि मूल्यांकन, नोंदणी, प्रशिक्षण, प्रशिक्षणानंतरचे मूल्यांकन आणि झालेल्या रोजगारनिर्मितीचा वेळोवेळी पाठपुरावा करणं. प्रत्येक कौशल्य विकासाची बॅच सुमारे ५५ दिवसांची असेल, हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
या भागीदारीबद्दल बोलताना फ्लिपकार्ट फाउंडेशनच्या संचालिका पूजा त्रिसाल म्हणाल्या, “फ्लिपकार्ट फाउंडेशनमध्ये, आम्ही आमची संसाधनं आणि कसब वापरून मोठे आणि शाश्वत बदल घडवून आणण्यावर आमचा विश्वास आहे. स्वदेश फाउंडेशनसोबतची ही भागीदारी रायगडच्या ग्रामीण समुदायाचं आर्थिक स्वरूप बदलण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करून, आम्ही केवळ व्यवसायिक प्रशिक्षणच देत नाही; तर आर्थिक स्वावलंबन आणि दीर्घकालीन विकासाच्या संधी निर्माण करत आहोत. या तरुणांना त्यांच्या समुदायात सकारात्मक बदल घडविण्याचं माध्यम होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि या उपक्रमाचा त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.” स्वदेस फाऊंडेशनच्या सह-संस्थापक झरीना स्क्रूवाला यांनी म्हणाल्या, “योग्य प्रकारे कौशल्य विकास केल्यास केवळ तरुण व्यक्तीचा आत्मविश्वास वाढत नाही, तर त्यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे आवश्यक असलेला आत्मविश्वास निर्माण होतो आणि हे तरुण त्यांच्या गावांतील इतरांनाही यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देतात. हा प्रभावशाली उपक्रम राबवण्यासाठी फ्लिपकार्ट फाऊंडेशनसोबत भागीदारी करण्यास आम्हाला आनंद होत आहे.या भागीदारीमुळे तरुणांना विशेष व्यवसायिक कौशल्ये आणि बहुविध क्षमतांनी सुसज्ज करण्याचे उद्दिष्ट असून त्यामुळे या योदनेचा लाभ घेणाऱ्या तरुणांच्या रोजगारक्षमतेत वाढ होईल आणि स्वयंरोजगाराचे मार्ग देखील खुले होतील. गेल्या वर्षात, फ्लिपकार्ट फाउंडेशनने आंध्र प्रदेश, आसाम, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये वंचित समुदायांसोबत विकासाच्या विविध मुद्द्यांवर काम केलं आहे. तसंच ही संस्था अकुशल आणि दुर्लक्षित घटकांना सेवा देणे, त्यांना मदत करणं आणि त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी काम करत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून शाश्वत परिणाम साधता येईल. आमची दुरदर्शी दृष्टी कायमच सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करते. हा उपक्रम भारतातच नव्हे तर परदेशातही राबवण्याचा आमचा उद्देश आहे. या उपक्रमात कॉर्पोरेट्स, शहरी भागातील तरुण, सरकारं, आणि इतर संस्थाचं महत्त्व आम्ही अधोरेखित करत आहोत. स्वदेश फाऊंडेशनच्या उपक्रमांमध्ये शिक्षण, पोषक आहार, पाणी, स्वच्छता आणि एकूण जीवनमानावर काम करणारे समुदाय केंद्रस्थानी असतात. सक्षम, गरिबीमुक्त ग्रामीण भारतासाठी आम्ही स्वत:च्याच आयुष्यात स्वतंत्रपणे बदल घडवण्यासाठी सुसज्ज असलेल्या समुदायासाठी आम्ही कायमच झटत असतो.