no images were found
भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे, फलक दाखवून तीव्र शब्दात राहुल गांधी यांचा केला निषेध
कोल्हापूर( प्रतिनिधी ) :- अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करणार असे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी आज भाजपा जिल्हा कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या एकत्रिकरणानंतर भाजपा पदाधिकारी जिल्हा कार्यालयातून राहुल गांधी यांच्या निषेधासाठी ताराराणी पुतळा परिसराकडे जाण्यासाठी निघाले असता पोलीस प्रशासनाने पदाधिकारी कार्यकर्त्यांना आढवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस व पदाधिकारी यांच्यात झटापट झाली. बंद केलेले कार्यालयाचे गेट उघडून कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले असता काही अंतरावर गेल्यानंतर पोलिसांनी ज्यादाची कुमक मागून कार्यकर्त्यांना त्याच ठिकाणी रोखले यानंतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आहे त्याच ठिकाणी ठिया आंदोलन करत राहुल गांधी यांचा काळे झेंडे, निषेधाचे फलक दाखवून तीव्र निषेध केला.
याप्रसंगी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राहुल गांधीचे करायचे काय खाली डोक वर पाय, राहुल गांधीचा धिक्कार असो, राहुल गांधी हाय हाय, संविधानाचा अपमान करण्याऱ्या राहुल गांधीचा धिक्कार असो अशा तीव्र शब्दात घोषणा देत निषेध व्यक्त केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, भारतातून परदेशात जायचे आणि त्याठिकाणी वारंवार देशाचा अपमान करायचा. खऱ्या अर्थाने बघितले तर आरक्षणाचे मारेकरी कोण असतील तर ते काँग्रेसचे नेतेच आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हेतूने संविधान या भारताला दिले त्या हेतूलाच काळ फासण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. आरक्षण कोणीही हटवू शकत नाही त्यामुळे राहुल गांधींनी अशा पद्धतीची विधाने करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करू नये अन्यथा भाजपा गप्प बसणार नाही.
प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, राहुल गांधी यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान जनता विसरणार नाही कॉंग्रेसला येत्या विधानसभेमध्ये जनता जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेल्या बेताल वक्तव्याचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा केलेला अपमान याबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने निषेध व्यक्त करतो.
याप्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, ज्यांच्या घराण्याने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्या राहुल गांधींनी महाराष्ट्रातील सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वीकारण्यास नकार दिला तेच राहुल गांधी आज कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावराच्या कार्यक्रमाला येत आहे याच्यासारखी शरमेची गोष्ट कोणतीच नाही.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, सत्यजित उर्फ नाना कदम, सरचिटणीस संजय सावंत, गायत्री राऊत, डॉक्टर सदानंद राजवर्धन, राजू जाधव, शिवाजी बुवा, विठ्ठल पाटील, शहाजी भोसले, हंबीरराव पाटील, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, गणेश देसाई, धनश्री तोडकर, माधुरी नकाते, अतुल चव्हाण, दिग्विजय कालेकर, अमर साठे, संगीता खाडे, राजसिंह शेळके, प्रदीप उलपे, सचिन कुलकर्णी, विशाल शिराळकर, विजयसिंह खाडे-पाटील, रुपाराणी निकम, अनिल कामत, प्रसंतोष माळी, ग्नेश हमलाई, सयाजी आळवेकर, हर्षद कुंभोजकर, अशोक लोहार, अवधूत भाट्ये, संदीप कुंभार, विद्या बनछोडे, सुनील पाटील, विश्वजीत पवार, अश्विनी गोपुगडे, स्वाती कदम, किरण नकाते, सुजाता पाटील, तेजस्विनी पार्टे, कोमल देसाई, धीरज करलकर, डॉ अरविंद माने, डॉ अजय चौगले, अनिल देसाई, अजिंक्य जाधव, रुपेश आडूळकर, धीरज पाटील, सागर रांगोळे, सुरेश गुजर, रविकिरण गवळी, सचिन सुतार, लता बर्गे, प्राची कुलकर्णी, सुनील पाटील, सतीश आंबर्डेकर, किसन खोत, दिलीप बोंद्रे, संजय सातपुते, महेश चौगले, दत्तात्रय मेडशिंगे, सुशीला पाटील, पूनम पाटील, अमित कांबळे, सुलोचना नार्वेकर, नामदेव पाटील, भरत पाटील, सरदार सावंत, मुकुंद गावडे, अमर पाटील, विजय रेडेकर, एकनाथ पाटील ई. पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.