no images were found
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिर, रस्ते व पार्किंग परिसर स्वच्छ ठेवा – राहूल रोकडे
कोल्हापूर : नवरात्र उत्सव, शाही दस-याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी महापालिकेच्या आरोग्य निरिक्षकांची आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शाही दसरा, ललीता पंचमी पालखी मार्ग, महालक्ष्मी मंदिर परिसर दैनंदिन स्वच्छता करणे, टाकाळा खण येथे साफसफाई करण्याच्या सूचना सर्व आरोग्य निरिक्षकांना दिल्या. त्याचबरोबर नवरात्र उत्सवाच्या कालावधीत शहरात पर्यटक मोठया प्रमाणात येत असल्याने शहर दैनंदिन स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची सकाळी 6 वाजता बायोमेट्रिक द्वारे हजेरी घ्यावी. सकाळी 6.30 पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी आपले प्रभागामध्ये कामकाज सुरु करावे. उशिरा येणा-या कर्मचा-यांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करा. सर्व ठिकाणी घंटागाडी नियमितपणे जाईल याचे योग्य ते नियोजन करा. यासाठी सकाळी 6 वाजता घंटागाडी वर्कशॉपमधून बाहेर पडून प्रभागात गेल्या पाहिजेत. वर्गीकृत स्वरुपाचा ओला व सुका कचरा संकलन करा. शहरात नागरीकांनी उघड्यावर कचरा टाकण्यापासून प्रतिबंधित करा. यासाठी जनजागृती करा. कचरा पडणाऱ्या ठिकाणी कर्मचारी थांबवून संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करा. कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यावसायिकांवर व विक्री करणा-यांवर कारवाई करा. उत्सव काळातील जे पार्किंगचे स्पॉट आहेत ते दैनंदिन स्वच्छ ठेवावेत. महालक्ष्मी मंदिर परिसरात स्वच्छतेसाठी तीन शिफ्टमध्ये स्वच्छता कर्मचारी ठेवा. या ठिकाणी कचरा टाकणेसाठी डसबीन ठेवावे अशा सूचना मुख्य आरोग्य निरिक्षक यांना दिल्या.