no images were found
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स 99.35% क्लेम सेटलमेंट रेशोसह आघाडीवर
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाही साठी 99.35% क्लेम सेटलमेंट रेशो जाहीर केला आहे, जो देशातील सर्व लाइफ इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सर्वाधिक आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, दावा निकाली काढण्यासाठी कंपनीकडे सरासरी फक्त 1.2 दिवसाचा कालावधी होता. तसेच, कंपनीने या कालावधीत निकाली काढलेल्या मृत्यूच्या दाव्यांचे एकूण मूल्य 381.24 कोटी रुपये होते.
श्री. अमिश बँकर, चीफ ऑपरेशन्स ऑफिसर, कस्टमर सर्व्हिस, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स म्हणाले, “घरातील कमावत्या सदस्याचा मृत्यू झाल्यास लाइफ इन्शुरन्स कुटुंबाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करतो. म्हणूनच, आम्ही प्रत्येक दावा अत्यंत काळजीपूर्वक आणि त्वरीत हाताळतो. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीसाठी आमचा वैयक्तिक मृत्यू क्लेम सेटलमेंट रेशो 99.35% होता आणि तपास न केलेले मृत्यूचे दावे निकाली काढण्यासाठी आम्हाला लागणारा सरासरी वेळ फक्त 1.2 दिवस होता. आमचा क्लेम सेटलमेंट रेशो हा उद्योगातील सर्वोत्कृष्ट आहे असा आमचा विश्वास आहे. याच कालावधीत, आम्ही एकूण 381.24 कोटी रुपयांचे दावे निकाली काढले.
आमचा क्लेम सेटलमेंट रेशो उद्योगात सातत्याने आघाडीवर राहिला आहे. उदाहरणार्थ, आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीमध्ये क्लेम सेटलमेंट रेशो 97.94% होता, आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी ते 98.14% वर स्थिर राहिला, आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 98.52% होता आणि आर्थिक वर्ष 2024 साठी ते 99.17% होता.आमचा ‘क्लेम फॉर शुअर’ सेवा उपक्रम सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर एका दिवसात सर्व पात्र मृत्यू दावे निकाली काढण्याचे वचन देतो. विशेष म्हणजे, या उपक्रमांतर्गत आम्ही आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 68.74 कोटी रुपयांचे दावे निकाली काढले.
अंमलात आणलेल्या तंत्रज्ञान उपायांमुळे आम्हाला दावा प्रक्रियेचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करता आला आहे, तसेच दावे नोंदवण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी व्हॉट्सअॅप, मोबाइल अॅप, वेबसाइट यासारखे सोयीस्कर टचपॉइंट्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.लाइफ इन्शुरन्स हे एक वचन आहे, जे आम्ही आमच्या पॉलिसीधारकांना त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या संरक्षित केले आहे याची खात्री करण्यासाठी देतो.”