
no images were found
पत्रकारिता विद्यार्थ्यांची विद्यापीठात स्वच्छता
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने मंगळवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.
विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी अधिविभागाच्या परिसरात स्वच्छता केली. यावेळी वाढलेले गवत काढण्यात आले. सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा कचराही गोळा केला. विभागाच्या आसपास वाढलेली अनावश्यक झुडपे काढण्यात आली. त्यासोबतच इमारतीसमोरील गार्डनमध्येही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत प्रा. डॉ. निशा पवार, डॉ. शिवाजी जाधव यांच्यासह बॅचलर ऑफ जर्नलिजम, मास्टर ऑफ जर्नलिझमचे विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.