
no images were found
डिजिटल माध्यमे आणि कायदे विषयावर सांगलीत उद्या कार्यशाळा
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मिडिया परिषद, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर 2024 रोजी के. डब्लू. सी. कॉलेज, शिवाजी नगर सांगली येथे ‘डिजिटल माध्यमे आणि कायदे’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी विविध माध्यमांच्या 150 हून अधिक पत्रकारांनी नोंदणी केली आहे. कार्यशाळेमध्ये मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव हे ‘डिजिटल माध्यमे आणि भारतीय न्याय संहिता’ या विषयावर तर महादेव बन्ने हे ‘माहिती तंत्रज्ञान कायदा आणि डिजिटल माध्यमे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पत्रकारांनी कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी केले आहे.