
no images were found
देशांतर्गत दमदार कामगिरीबरोबरच नागपूर प्लँट सीएट साठी महत्त्वाचे निर्यात केंद्र
नागपुर – सीएट या भारतातील आघाडीच्या टायर उत्पादक कंपनीने आज विक्रमी टप्पा गाठल्याचे जाहीर केले असून, कंपनीच्या नागपूर येथील प्लँटमधले १०० दशलक्षाव्या टायरचे उत्पादन करण्यात आले. ही कामगिरी सिएटची भारत, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दुचाकी टायर्सना असलेली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठीची बांधिलकी जपणारी आहे.
सीएटच्या उत्पादन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष जयाशंकर कुरुप्पल या विक्रमी टप्प्याविषयी म्हणाले, ‘नागपूर प्लँटमध्ये तयार करण्यात आलेले १०० दशलक्षावे टायर हे नावीन्य, शाश्वतता आणि देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुचाकी टायर्सना असलेली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठीची बांधिलकी दर्शविणारी आहे. आमच्या नागपूर प्लँटने उत्पादनक्षेत्रात मापदंड प्रस्थापित करण्याबरोबरच कामगारांना सक्षम केले आहे. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, त्यात प्रामुख्याने जेंडर डायव्हर्सिटी (शॉप फ्लोरवर अंदाजे २५ टक्के स्त्रियांचा समावेश), सेल्फ मॅनेज्ड टीम्स (एसएमटी) आणि पर्सन्स विथ डिसेबिलिटी (दिव्यांग व्यक्तींचा समावेश) यांचा समावेश आहे. आम्हाला या कामगिरीचा अभिमान वाटत असून, जगभरातील ग्राहकांना उच्च दर्जा असलेली उत्पादने पुरविण्यासाठी आम्ही यापुढेही वचनबद्ध राहू.’
जागतिक विक्री आणि पुरवठा साखळी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल पवार म्हणाले, ‘आमचा नागपूर प्लँट देशांतर्गत मागणी पुरविण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो, तसेच तो जगभरातील बाजारपेठांना सेवा देणारा प्रमुख निर्यात केंद्रही आहे. स्मार्ट फॅक्टरी क्षमता, एआय आणि एमएल इंटिग्रेशन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची दमदार पुरवठा साखळीशी सांगड घालत आम्ही महत्त्वाच्या सर्व दुचाकी ओईएम्ससह यशस्वी पुरवठा भागीदारी स्थापन केली आहे. या टप्प्यामुळे सीएटची भारत, तसेच देशभरातील ग्राहकांना जागतिक उत्पादने मिळवून देण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.’
२०१६ मध्ये स्थापन करण्यात आलेला नागपूर प्लँट सीएटच्या दुचाकी टायर उत्पादनात महत्त्वाची भूमिका निभावतो. या प्लँटने उच्च कामगिरी करणाऱ्या, प्रीमियम दर्जाच्या झूम एक्स३, ग्रिप एक्स५ आणि एनर्जी राइड ईव्ही यांचे उत्पादन केले आहे. कंपनीद्वारे भारतातील दुचाकी टायर्सच्या एकूण मागणीचा मोठा वाटा पूर्ण केला जातो. यावरून भारतीय दुचाकी टायर बाजारपेठेतील कंपनीचे आघाडीचे स्थान दिसून येते.
देशांतर्गत दमदार कामगिरीबरोबरच नागपूर प्लँट कंपनीसाठी महत्त्वाचे निर्यात केंद्र आहे. या प्लँटद्वारे विविध बाजारपेठांना निर्यात केली जाते व आफ्रिका, अमेरिका, युरोप, बांगलादेश, फिलिपाइन्स, नेपाळ, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. नागपूर प्लँट पुढील अनोख्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. या वर्षी सीएट १०० वा वर्धापन दिन साजरा करत असून, हा टप्पा कंपनीच्या देशांतर्गत दुचाकी बाजारपेठेत आघाडीचे स्थान राखण्याबरोबरच जागतिक विस्तार करण्याच्या उद्दिष्टाचे प्रतीक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि निष्ठावान कर्मचारीवर्ग यामुळे या उद्दिष्टांना चालना मिळत आहे.