no images were found
“श्रीमद रामायण’मध्ये लव आणि कुश भगवान राम आणि सीता यांच्यातील अंतर कसे करतील कमी ?
सोनी सबवरील धार्मिक मालिका ‘श्रीमद रामायण’ही भगवान राम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बन्सल) यांची महाकथा आहे. गेल्या काही भागांमध्ये, सहस्त्र रावणने (प्रणीत भट्ट) सीता राहत असलेल्या आश्रमात गोंधळ घालण्यासाठी राक्षस पाठवताना प्रेक्षकांनी पाहिले आहे. सीता जशी आपल्या जुळ्या मुलांना जन्म देते, तेव्हा त्या राक्षसांनी जंगलात आणि आश्रमात सर्वनाश करून सर्वांना संकटात टाकले आहे. खूप अराजकता असूनही सीतेने मोठ्या धैर्याने लव आणि कुशला जन्म देऊन संकटांमध्ये नवीन सुरुवात केली आहे.
आगामी भागांमध्ये, प्रेक्षक श्रीमद रामायणच्या एका नवीन टप्प्याचे साक्षीदार होतील. कारण आता कथा १२ वर्षांनी समोर जाणार आहे. लव आणि कुश अशा आता मोठे झानले असून त्यांना आजूबाजुच्या परिसराबद्दल उत्सुकता आहे. आश्रमात वाढलेले लव आणि कुश शूर प्रभू राम आणि त्यांच्या शौर्याबद्दलच्या कथा ऐकत आहेत. मात्र, आपण खरोखर महान प्रभू राम आणि सीता यांची मुले आहोत याची त्यांना कदापि जाणीव नसते. एका निर्णायक क्षणामध्ये लव आणि कुश आई सीतेला प्रभू रामाबद्दल प्रश्न विचारून त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टीने हे पाऊल असते.
दोघेही त्यांच्या वंशाजाविषयीचे सत्य उघड करतील का आणि ते त्यांच्या माता- पित्यामधील अंतर कसे कमी करतील?
श्रीमद रामायणामध्ये सीतेची भूमिका साकारणारी प्राची बन्सल म्हणाली,” लव आणि कुशच्या जन्मानंतर सीतेची भूमिका करणे हे माझ्यासाठी खूप कठीण आणि भावनिक होते. कठीण काळातही सीतेचे सामर्थ्य आणि शौर्य खूप मोठ असल्याचे पहायला मिळते. जेव्हा सीता प्रभू रामाची ओळख आणि त्यांचे नाते लपवून ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते,तेव्हा लव आणि कुश पुन्हा त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.