Home मनोरंजन  ‘बदल पे पाँव है’ मधील लावण्यशी संबंध तोडताना बानीला रजतच्या खऱ्या भावना कळतात

 ‘बदल पे पाँव है’ मधील लावण्यशी संबंध तोडताना बानीला रजतच्या खऱ्या भावना कळतात

5 second read
0
0
24

no images were found

 ‘बदल पे पाँव है’ मधील लावण्यशी संबंध तोडताना बानीला रजतच्या खऱ्या भावना कळतात

 

सोनी सब वाहिनीवरील  ‘बदल पे पाँव है’ बानी (अमनदीप सिद्धू) च्या अथक प्रवासाचे वर्णन करणारी मालिका आहे. आर्थिक मर्यादा असूनही आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी झटणारी एक जिद्दी आणि महत्वाकांक्षी मुलगी म्हणून बानीकडे पाहिल्या जाते. अलीकडील काही भागांमध्ये बानीचा नवरा रजत (आकाश आहुजा) ची पूर्वीची जोडीदार लावण्या (भाविका चौधरी) हिच्याशी वाद घातल्याने तणाव वाढत आहे आणि लावण्या कोणत्याही किंमतीत त्याला परत मिळवण्याची शपथ घेते.

मालिकेच्या आगामी भागात रजत आणि लावण्याबद्दल बानीचा गोंधळ शेवटी दूर होतो कारण तिने त्याला लावण्याला नाकारल्याचे ऐकले आहे. रजतला आता लावण्याबद्दल काहीही भावना उरल्या नसल्याने बानीला समाधान वाटत असले तरी, त्यांच्या भेटीमुळे ती अजूनही दुखावली गेली आहे. लावण्या शेवटी बानी आणि रजतच्या आयुष्यातून बाहेर पडते तेव्हा या जोडीसाठी गोष्टी आशादायक वाटू लागतात. रजत बानीचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि त्यांचे नाते पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. जसजसे दोघांत जवळीक वाढते तसतसे प्रेक्षक हे विचार करत असतात की, बानी आणि रजत शेवटी एकमेकांबद्दलच्या त्यांच्या खऱ्या भावना कबूल करतात, त्यानंतर पुढे काय होणार आहे.

 बानी अरोराची भूमिका साकारणारी अमनदीप सिद्धू म्हणाली, बानीने रजतसोबतच्या तिच्या नात्याचे नेहमीच संरक्षण केले आहे. लावण्यसोबतच्या गैरसमजांमुळे मालिकेत खूप तणाव निर्माण झाला होता, पण आता त्यांच्या नात्यातील गैरसमज दूर झाल्यामुळे, बानी आणि रजत एकमेकांबद्दलच्या त्यांच्या खऱ्या भावनांना आता व्यक्त करू लागले आहेत. तथापि, मालिकेत आणखी एक धक्कादायक वळण येणार आहे. कारण काहीतरी महत्त्वपूर्ण आणि अनपेक्षित घडणार आहे. रजत आणि बानीमध्ये सुरू असलेल्या रोमान्समध्ये हे एक नवीन आव्हान असणार असल्याचे ती म्हणाली.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून “टेक्नोत्सव २के२५” -राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरु 

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून “टेक्नोत्सव २के२५” -राष्ट्रीय स्तर…