no images were found
संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह पुर्नबांधणीच्या कामासाठी सल्लागार निवडण्याची प्रक्रिया अंतीम टप्यात
कोल्हापूर : संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह पुर्नबांधणीच्या कामासाठी सल्लागार निवडण्याची प्रक्रिया अंतीम टप्यात आहे. यामध्ये ए.एन.एल.असोसिटस्, मुंबई यांनी अंदाजपत्रकीय दराच्या 7.5 टक्के फि (GST वगळून) तर स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि., नवी मुंबई यांनी अंदाजपत्रकीय दराच्या 4.5 टक्के फि (GST वगळून) इतर सर्व करांसह दर सादर केलेला आहे. यामध्ये स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि. यांनी सादर केलेल्या दराबाबत वाटाघाटी (Negotiation) करण्यास तयार असलेबाबतचे पत्र दिले आहे. व्यापारी निविदाचा प्रतिसाद लक्षात घेऊन दोन्ही निविदाधारकांना गुणांकन देण्यात आले. यामध्ये स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि.नवी मुंबई यांचे गुणांकन जास्त असल्याने त्यांना दराबाबत वाटाघाटीसाठी पत्र देण्यात आले आहे.
महापालिकेच्या संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह इमारतीमध्ये पाठीमागील स्टेजच्या बाजूने सुरू झालेल्या अग्नीप्रक्षोभामुळे हे नाटयगृह दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी अग्निच्या भक्ष्यस्थळी पडले. केशवराव भोसले नाटयगृह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी दि.09 ऑगस्ट 2024 रोजी दरपत्रके (कोटेशन) मागविण्यात आली. नाटयगृह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी 6 सल्लागारांकडून दरपत्रके सादर करण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वात कमीचा देकार असलेल्या स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि., नवी मुंबई यांना स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी दि.15 ऑगस्ट 2024 रोजी कार्यादेश देण्यात आला. स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि.नवी मुंबई यांनी प्राथमिक स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल दि.2 सप्टेंबर 2024 रोजी सादर केला आहे. तसेच नाटयगृहाच्या ठिकाणी दि.10 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. नाटयगृहाच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री महोदय यांनी रु.25.00 कोटी निधीची घोषणा केली.
संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह इमारतीचे पुर्नबांधणी करणेकामी सल्लागार, अनुभवी व तज्ञ वास्तुविशारद यांची नियुक्ती करणे कामी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करणेत आली. संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह इमारतीचे पुर्नबांधणी करणेकामी सल्लागार, अनुभवी व तज्ञ असलेल्या वास्तुविशारद यांचकडून दि.17 ऑगस्ट 2024 रोजी EOI मागविणेत आलेले होते. खासदार श्रीमंत शाहु छत्रपती महाराज यांनी संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह पुर्नबांधणी कामी त्यांच्या अध्यक्षतेखाली दि.21 ऑगस्ट 2024 रोजी समिती स्थापन केली. वास्तुविशारद नियुक्ती कामी EOI ला प्रतिसाद मिळून एकूण 6 वास्तुविशारद कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या. सदर सहा निविदांची प्राथमिक छाननी होऊन सर्व 6 निविदाधाराकांना दि.05 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले. वास्तुविशारद नियुक्ती कामी प्राप्त सर्व 6 निविदाधारकांनी सर्वसाधारणपणे 40 ते 45 मिनिटांचे सादरीकरण दि.5 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय समिती समोर केले. सादरीकरण पूर्ण झाल्यावर जिल्हास्तरी समितीने सदर कंपनीच्या Company Profile, Relevant Work, Idea Concept & Methodology या निकषांच्या आधारे गुणांकन देऊन ए.एन.एल.असोसिटस्, मुंबई व स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट, नवी मुंबई या 2 फर्मची संक्षिप्त यादी निश्चित केली.
नाटयगृहाच्या सध्याच्या इमारतीमधील उणीवा व इतर सूचना व सुधारणा देणे कामी कोल्हापूर मधील विविध रंगकर्मी व संबंधित व्यक्तींशी जिल्हास्तरीय समिती सोबत बैठक दि.06 सप्टेंबर 2024 रोजी पारपडली. सदर बैठकीमध्ये देणेत आलेल्या सूचना व सुधारणा संक्षिप्त यादीमधील दोन्ही कंपन्यांना कळविणेत आल्या व सदर सूचना व सुधारणांचा समावेश करुन अंतिम सादरीकरण जिल्हास्तरीय समिती समोर दि.13 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करणेबाबत व सदर दिवशी व्यापारी निविदा सादर करणेबाबत कळविण्यात आले. या दोन्ही कंपन्यांचे सादरीकरण जिल्हास्तरीय समितीसमोर करण्यात येऊन Presentation, Estimate Detailing, Fulfillment of Requirement, Understanding Scope of Project या निकषांच्या आधारे जिल्हास्तरीय समितीने गुणांकन दिले. त्यानंतर दोन्ही फर्मचे व्यापारी लखोटे (Commercial Bid) व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये सर्व समिती सदस्यांच्या सहयांसह उघडण्यात आले. त्यामध्ये ए.एन.एल.असोसिटस्, मुंबई यांनी अंदाजपत्रकीय दराच्या 7.5 टक्के फि (GST वगळून) तर स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि., नवी मुंबई यांनी अंदाजपत्रकीय दराच्या 4.5 टक्के फि (GST वगळून) इतर सर्व करांसह दर सादर केलेला आहे. यामध्ये स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि. यांनी सादर केलेल्या दराबाबत वाटाघाटी (Negotiation) करण्यास तयार असलेबाबतचे पत्र दिले आहे. व्यापारी निविदाचा प्रतिसाद लक्षात घेऊन दोन्ही निविदाधारकांना गुणांकन देण्यात आले. यामध्ये स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि.नवी मुंबई यांचे गुणांकन जास्त असल्याने त्यांना दराबाबत वाटाघाटीसाठी पत्र देण्यात आले आहे.