
no images were found
हृदयाचे ठोके अनियमित पडण्याच्या दुर्मिळ समस्येसाठी क्विनिडिन सल्फेट गुणकारी
मुंबई – हृदयाचे ठोके अनियमित पडण्याची दुर्मिळ समस्या असलेल्या रुग्णांसाठी USV प्रा. लि.ने २०० मिलिग्रॅम्स (mg) क्निनिडिन सल्फेट असलेल्या Q-rite टॅब्लेट्स नुकत्याच बाजारात आणल्या. या औषधाच्या बाजारपेठेत दाखल होण्याने भारतात क्विनिडिन सल्फेट टॅब्लेट्स व्यावसायिक स्तरावर विक्रीसाठी उपलब्ध असण्याची मोठी गरज पूर्ण झाली आहे. कंपनीने गाठलेला हा लक्षणीय टप्पा आरोग्यसेवा क्षेत्रातील एक विश्वासार्ह सहकारी या नात्याने रुग्णांवरील उपचारांमध्ये सुधारणा घडवून आणण्याप्रती USV ची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
USV चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रशांत तिवारी म्हणाले, “रुग्णांच्या गरजांसाठी, विशेषत: हृदयरोगाचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी आम्ही कायमच सहवेदना बाळगली आहे व या समस्येच्या व्यवस्थापनासाठी आमच्याकडे पर्याय नव्हता. Q-rite टॅब्लेट्स भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्याने औषधोपचारांच्या उपलब्धतेत सुलभता आणण्याचे आमचे ध्येय अधोरेखित झाले आहे. विशिष्ट कारणासाठी निर्मित औषधांप्रती आम्ही जपलेल्या बांधिलकीमुळे आम्हाला विशिष्ट समस्यांवरील नेमके उपाय पुरवता येतील व त्यातून रुग्णांना लक्षणीयरित्या चांगले परिणाम मिळतील, असे आम्हाला वाटते.”
या औषधाच्या बाजारपेठेतील आगमनाचे महत्त्व विशद करताना इंडियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी (ISE) चे अध्यक्ष डॉ. आदित्य कपूर आणि मानद महासचिव (ISE) डॉ. केतन मेहता यांनी आपल्या संयुक्त निवेदनामध्ये नमूद केले आहे, “क्विनिडिन हे अरिदमियावरील एक जुने तरीही बहुगुणी, बहुउपयोगी औषध आहे. त्याच्या भारतात उपलब्ध होण्याने रुग्णांच्या या विशिष्ट गटाच्या गरजा पुरेशा प्रमाणात भागविल्या जातील.”
Q rite टॅब्लेट्स सध्या निवडक हॉस्पिटल्समधील फार्मसींमध्ये आणि ऑनलाइन फार्मास्युटिकल रिटेलर Tata 1mg वर उपलब्ध आहेत.