Home Uncategorized शिक्षण व कृषी क्षेत्राची आवड असणाऱ्या पिढीला  डी वाय पाटील ग्रुपने नवी दृष्टी दिली

शिक्षण व कृषी क्षेत्राची आवड असणाऱ्या पिढीला  डी वाय पाटील ग्रुपने नवी दृष्टी दिली

1 second read
0
0
19

no images were found

शिक्षण व कृषी क्षेत्राची आवड असणाऱ्या पिढीला  डी वाय पाटील ग्रुपने नवी दृष्टी दिली

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): कृषी क्षेत्र व उच्च शिक्षणाची आस्था असलेल्या कोल्हापूरातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील नव्या पिढीला एक दृष्टी देण्याचे काम डी. वाय. पाटील ग्रुपने केले आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी तळसंदे येथे काढले.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार शरद पवार यांनी बुधवारी दुपारी तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटीला भेट दिली. डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के‌. गुप्ता, डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के प्रथापन, फार्म हेड प्रा. अमोल गाताडे यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य व प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांनी संवाद साधताना पवार पुढे म्हणाले, हिंदूस्थानात इंडियन कौन्सील ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च ही संस्था कृषी क्षेत्रात देशभरात संशोधनाचे काम करते. या संस्थेची ८० संशोधन केंद्रे आहेत. याच धर्तीवर डी. वाय. पाटील ग्रुप आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून परीसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधायुक्त शिक्षण देण्याचे काम गेली अनेक वर्षे करीत आहे. डी. वाय. पाटील ग्रुपने केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतीची आस्था आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या नव्या पिढीला दृष्टी देण्याचे काम केले आहे. डी. वाय पाटील ग्रुपचा असाच विस्तार आणि प्रगती होवो, अशा शुभेच्छा श्री. पवार यांनी दिल्या.

डॉ. संजय डी. पाटील यांनी तळसंदे येथे सुरू असलेली विविध महाविद्यालये व प्रकल्पांची माहिती श्री पवार यांना दिली. डी वाय पाटील डेअरी फार्म व मुक्त गोठा पाहून श्री पवार अतिशय प्रभावीत झाले. येथील विविध गाई व म्हशींच्या जातींबद्दल व कृषी पदार्थांबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी डॉ. संजय डी पाटील व प्रा. गाताडे यांच्याकडून जाणून घेतली. स्मृती उद्यान येथील यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पवार यांनी अभिवादन केले.

यावेळी डी. वाय कृषी व तंत्र विद्यापीठाच्या प्रांगणात श्री शरद पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कृषी महाविद्यालयाच्या न्यूज लेटरचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते झाले.

शरद पवार यांच्या हस्तेच ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ त्याच्या तीन वर्षांच्या यशस्वी कामगिरीची माहिती प्रेझेंटेशनद्वारे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी यावेळी दिली. यावेळी पवार यांनी कृषी मधील नवीन तंत्रज्ञान नवीन अभ्यासक्रम याबद्दल प्रश्न विचारून नव्या अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. पवार यांनी यावेळी कृषी अभियांत्रिकी, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र टेक्निकल कॅम्पस येथे भेट दिली.

डॉ. संजय डी.पाटील यांच्या निवासस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांची भेट घेतली. यावेळी यावेळी ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांनी श्री पवार यांना डी वाय पाटील ग्रुप विस्तार, विविध संस्था व कार्याची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. कार्याचीसौ शांतादेवी डी. पाटील, सौ पूजा ऋतुराज पाटील, सौ वृषाली पृथ्वीराज पाटील, व्ही. बी पाटील, माजी कुलगुरू डॉ. शैलेश पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डी.एन शेलार, प्रा. पी एस पाटील, डॉ. जयेंद्र खोत, डॉ. व्ही. व्ही. भोसले, सुजित सरनाईक, प्राचार्य डॉ.महादेव नरके, डॉ. आर. के. शर्मा, डॉ. शिम्पा शर्मा, डॉ. अजित पाटील, डॉ. उमाराणी, यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…