no images were found
शिरगावकर ग्रुप ऑफ कंपनीज् पुरस्कृत एच टू ई महाराष्ट्र राज्य ज्युनिअर मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेस पासून प्रारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- जागतिक बुद्धिबळ संघटना,अखिल भारतीय बुद्धीबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने मांगल्य मल्टीपर्पज सभागृह, मेनन बंगल्यासमोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एच टू ई महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा उद्या गुरुवारपासून रंगणार आहे..
सकाळी नऊ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन शिरगावकर उद्योग समूहाचे सचिन शिरगावकर, शिवाजी विद्यापीठाचे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स शरद बनसोड, गोकुळचे संचालक व युथ बँकेचे चेअरमन डॉक्टर चेतन नरके, विश्वविजय खानविलकर, उमेश भोगावकर,पद्माकर कापसे व प्रा.अरुण मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.त्यानंतर सकाळी बरोबर दहा वाजता पहिल्या फेरीस प्रारंभ होईल.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बांदा ते चांद्यापासून साधारण 100 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत.यापैकी जवळपास 50 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत.
या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून पुण्याच्या आंतरराष्ट्रीय पंच वनिता श्रोत्री व उपमुख्य पंच म्हणून सांगलीच्या आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर यांची नियुक्ती महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने केली आहे. स्पर्धा संयोजन समितीचे चेअरमन डॉ.चेतन नरके चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, सचिव मनिष मारुलकर व उपाध्यक्ष धीरज वैद्य यांनी सर्वांना आमंत्रित केले आहे..