
no images were found
दुबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती एटलास रामचंद्रन यांचे निधन
मुंबई : प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि चित्रपट निर्माते एटलस रामचंद्रन (एम. एम रामचंद्रन) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 80व्या वर्षी दुबईत रविवारी त्यांचे निधन झाले. रामचंद्रन यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.