no images were found
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने “ट्रायथलॉन व ड्युअथलॉन” स्पर्धा संपन्न
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने “ट्रायथलॉन व ड्युअथलॉन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “लोहपुरुष” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून यावर्षी ७५० हुन अधिक जणांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धेमध्ये दोन किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावणे अशा स्वरूपात ही स्पर्धा संपन्न झाली. कोल्हापूर ही “आयर्न मॅन” ची खाण मानली जाते. जागतिक दर्जाचे आयर्न मॅन हे अशाच स्पर्धातून घडतात. असे आमदार सतेज पाटील यांनी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
यावेळी आ. ऋतुराज पाटील व आ. जयंत आसगावकर, स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष चेतन चव्हाण, आकाश कोरगावकर, खुशबू तलरेजा,डॉ. विजय कुलकर्णी,डॉ. प्रदीप पाटील, एस. आर.पाटील, आशिष तंबाखे, महेश शेळके, राहुल माने, अश्विन शिंदे, आदित्य शिंदे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेसाठी विलो आणि रग्गेडियन यांचे सहकार्य लाभले.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेतील विजेत्यांना फिनिशर्स टी शर्ट, मानचिन्ह आणि प्रमाण पत्रे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी विलो आणि रग्गेडियन यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेतील विजेते- खुल्या गटातील- हाफआयर्न ट्रायथोलॉन लोहपुरुष गट- पंकज राऊलू, महिला गट- निंबाळकर, ऑलंपिक ट्रायथोलॉन गटात- पुरुष गट- देव अंबोकर, महिला गट- तनया डकवार
स्प्रिंट ट्रायथोलॉन गटात- पुरुष-आदित्य देसाई, महिला- अहिल्या चरण. ऑलिंपिक ड्यूअलथॉन- पुरूष गट- वीरेंद्र पवार, महिला गट- ज्योती मोरे, स्प्रिंट ड्यूअलथॉन पुरुषगट- उत्कर्ष गर्दी, महिला गट- अनुष्का राऊत.