no images were found
जागतिक हृदय दिनानिमित्त ” हृदयाविषयी परिसंवाद आणि कार्यशाळा संपन्न”
रोटरी क्लब ऑफ करवीर आणि डॉ .शिंदे सुपरस्पेशिअलिटी हार्ट क्लिनिक कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक हृदय दिनानिमित्त ” हृदया विषयी परिसंवाद आणि कार्यशाळा संपन्न”
कोल्हापूर: चौकस व सात्विक आहार, तणतणावापासून मुक्तता, नियमित व्यायाम व आरोग्य तपासणी या त्रिसूत्रीमुळे हृदयविकारावर मात करता येते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, व्यसनाधीनता आणि अनुवंशिकता यामुळे ब्लड प्रेशर, मधुमेह व हृदयविकारासारख्या आजारांचा शरीरावर परिणाम होतो. पूर्वी पन्नाशीनंतर हृदयरोग व्हायचा परंतु आता विशी व तिशीतल्या तरुणांमध्येच हा धोका जास्त आहे. परंतु भीती न बाळगता जागृत रहावे. प्राथमिक लक्षणात जर हृदयरोग ओळखता आला तर त्यावर मात करता येते, असे प्रतिपादन डॉ. आलोक शिंदे यांनी केले. हृदयविकारासंबंधी कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ करवीर व डॉ. शिंदे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयविकारांविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शिंदे पुढे म्हणाले आशिया खंडामध्ये हृदयविकाराचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. अचानक मृत्यू होण्यामध्ये भारत जवळजवळ पहिल्या स्थानावर आलेला आहे. यामुळे जागृत व सतर्कता बाळगणे अतिशय आवश्यक आहे. पाहुण्यांचा परिचय डॉ. संदीप पाटील यांनी करून दिला.
प्रमुख उपस्थिती वसंत मुळीक , पोलीस उपनिरीक्षक तानाजी सावंत यांची होती. तसेच कोल्हापूर मधील सुप्रसिदध आहारतज्ञ रुफिना कुटिन्हो या ” आरोग्यदायी हृदयासाठी आहार ” याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले . तसेच या कार्यशाळेमध्ये CBC , BSL R. Creat Lipid Profile HbA1C अशा रक्ताच्या चाचण्या सवलतीच्या दरामध्ये करण्यासाठी नागरिकांनी याचा लाभ घेतला . अध्यक्ष उदय पाटील, सचिव स्वप्निल कामत रो.निलेश भादुले, रो. प्रवीणसिंह शिंदे, धनाजी देसाई आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रिया देसाई यांनी केले.