Home Uncategorized शिवाजी विद्यापीठात २० पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय  शिक्षण-उद्योग-शासन परिषद

शिवाजी विद्यापीठात २० पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय  शिक्षण-उद्योग-शासन परिषद

22 second read
0
0
21

no images were found

शिवाजी विद्यापीठात २० पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय  शिक्षण-उद्योग-शासन परिषद

कोल्हापूर(प्रतिनिधी ): शिवाजी विद्यापीठाच्या वतीने २० व २१ जानेवारी २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषद २.० चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षण, उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करून नवोपक्रम आणि स्टार्टअप्स यांना बळ देऊन विकसित भारत – 2047 हे ध्येय साध्य करणे हा आहे. या परिषदेत आंतरराष्ट्रीय, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि शासनाचे प्रतिनिधी यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. नवोन्मेष, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि संशोधन-उद्योग सहकार्य आणि स्टार्टअप्स या विषयांवर विशेष भर दिला  आहे. महिला उद्योजकांच्या यशोगाथा सादर करण्यासाठी विशेष सत्र आयोजित केले असून त्यांच्या व्यावसायिक अनुभवांचे सविस्तर सादरीकरण होणार आहे. या परिषदेत स्टार्टअप प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा आणि इनोव्हेशन हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आली आहे, विद्यार्थी, संशोधक आणि स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना व उपक्रम सादर करण्याची संधी मिळणार आहे. विविध स्पर्धेतील विजेत्यांना/ उद्योजकांना एकूण पंधरा लाख रुपयेपर्यंत बीज निधी भांडवल म्हणून दिला जाणार आहे.

या परिषदेच्या *उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती अश्विनी दानिगोंड (संस्थापक, मनोरा इन्फो-सॉल्यूशन्स प्रा. लि.) उपस्थित राहणार असून, सन्माननीय पाहुणे म्हणून प्रा. कंदलम रामानुजाचार्य (अमेरीका) आणि डॉ. चंद्रिका कौशिक (दिल्ली) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. परिषदेचे अध्यक्षस्थान मा. कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी भूषविणार असून परिषदेस मा. प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) ज्योती जाधव उपस्थित* राहणार आहेत. 

परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत शास्त्रज्ञ प्रा. (डॉ.) मोहम्मद याझीद बिन (मलेशिया), डॉ. महेश सूर्यवंशी (ऑस्ट्रेलिया) आणि डॉ. अहमद इलियास बिन (मलेशिया), गिरीश चितळे (चितळे उद्योग समुह), डॉ. विनायक पारळे (जपान), डॉ. देवव्रत हर्षे (डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ), श्री. सचिन कुंभोजे (सहसंचालक CIREE), श्री.  योगेश कुलकर्णी (संचालक, Global Finance Professionals), श्रीमती. आरती भोसले (Green Solutions Pune), श्री. जयदीप चॅटर्जी (ESG Program Director, Cummins India Pune), मा. प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर (पुणे विद्यापीठ), श्री. रमेश चव्हाण (Kirloskar Oil Engines), श्री. नितीन वाडीकर (Chairman, Maharashtra Engineering) सहभागी होऊन नवोन्मेष, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संशोधन-उद्योग सहकार्य तसेच जागतिक संशोधन प्रवाहांवरील आपले अनुभव आणि विचार मांडणार आहेत. 

या परिषदेसाठी *देश-विदेशातून सुमारे ३०० पेक्षा अधिक प्रतिनिधी* सहभागी होणार असून, यामध्ये अभ्यासक, संशोधक, उद्योगतज्ज्ञ, उद्योजक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परिषदेदरम्यान व्यावसायिक मार्गदर्शन सत्रे, नवोन्मेषक–गुंतवणूकदार बैठक, नवोन्मेष संशोधन व पेटंट सादरीकरण, तसेच, शिवाजी विद्यापीठात ‘शार्क टँक’ पिचिंग स्पर्धा आयोजित केली आहे. यासोबतच पेटंट गॅलरी, स्टार्टअप्सचे स्टॉल्स, नाविन्यपूर्ण उत्पादने व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा आणि इनोव्हेशन हॅकाथॉनही होणार आहे. नवोन्मेष हॅकाथॉन आणि पिचिंग स्पर्धेच्या माध्यमातून *निवडक स्टार्टअप कल्पनांना एकूण १५ लाख रुपयांचे बीज भांडवल* प्रदान करण्यात येणार आहे. या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, करिअर व स्टार्टअपच्या संधी, संशोधन सादरीकरणाचे व्यासपीठ तसेच उद्योगविश्वाशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे. उद्योगपती व गुंतवणूकदारांना नव्या संशोधनाधारित कल्पना, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स आणि संभाव्य सहकार्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच नागरिकांना ‘विकसित भारत’ संकल्पनेत संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेची भूमिका समजून घेण्याची संधी मिळणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सर्व विद्यार्थी, संशोधक, उद्योगपती, स्टार्टअप्स तसेच नवोन्मेषात रुची असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…