Home सामाजिक टोयोटा किर्लोस्कर मोटर ला रायचूर मध्ये स्वच्छ भारत उपक्रमांसाठी सीएसआर टाइम्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला रायचूर मध्ये स्वच्छ भारत उपक्रमांसाठी सीएसआर टाइम्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

5 second read
0
0
18

no images were found

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला रायचूर मध्ये स्वच्छ भारत उपक्रमांसाठी सीएसआर टाइम्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

 

मुंबई: कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी आपली बांधिलकी दाखवून, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज जाहीर केले की तिला ‘स्वच्छ भारत’ उपक्रमांअंतर्गत प्रतिष्ठित सीएसआर टाइम्स पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. निती आयोगाद्वारे ओळखला जाणारा कर्नाटकातील रायचूर या महत्वाकांक्षी जिल्ह्यात, त्याच्या एबीसीडी (ए बिहेव्हियरल चेंज डेमोंस्ट्रेशन) उपक्रमांद्वारे स्वच्छता, आरोग्य आणि हायजिन सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल टीकेएमला हा पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार सोहळा दरबार हॉल, राजभवन, गोवा येथे पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत तसेच माननीय श्रीपाद येसो नाईक, ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री, आणि श्री पुनीतकुमार गोयल (आयएएस), मुख्य सचिव, गोवा सरकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सीएसआर टाइम्स अवॉर्ड हा एक अत्यंत प्रतिष्ठित सन्मान आहे, जो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये उत्कृष्ट योगदानासाठी संस्थांना सन्मानित करतो. 2013 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, या पुरस्काराने सामाजिक कल्याणासाठी उल्लेखनीय समर्पण दर्शविणारे उपक्रम साजरे केले आहेत. 2024 मधील राष्ट्रीय सीएसआर समिट आणि सीएसआर टाइम्स अवॉर्ड्सच्या 11 व्या आवृत्तीने संपूर्ण भारतातील समुदायांवर अर्थपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या प्रकल्पांवर प्रकाश टाकून ही परंपरा सुरू ठेवली.

टोयोटा किर्लोस्कर मोटरचा रायचूरमधील सर्वसमावेशक प्रयत्नांसाठी सन्मान करण्यात आला, जिथे कंपनीने 100 सरकारी शाळांमध्ये एबीसीडी कार्यक्रम राबवला, ज्यामध्ये शाळेतील मुले, शिक्षक आणि समुदायासाठी (सॅनिटेशन बिहेव्हियरल चेंज प्रोग्राम) स्वच्छता वर्तणुकीतील बदल कार्यक्रमांचा समावेश होता. कार्यक्रमात प्रॅक्टिकल आणि थिअरॉटिक ट्रेनिंग, उपभोग्य वस्तूंचा पुरवठा, स्कूल कॅबिनेट आणि शाळा विकास आणि देखरेख समिती (एसडीएमसी) मजबूत करणे, शाळा आणि समुदायामध्ये जागरूकता व्हिडिओ प्रसारित करणे यांचा समावेश आहे. टीकेएमच्या प्रयत्नांमध्ये स्थानिक समुदायांना स्वच्छताविषयक पायाभूत सुविधा राखण्यासाठी प्रशिक्षण देणे आणि चांगले आरोग्य, स्वच्छता आणि स्वच्छतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे देखील समाविष्ट आहे. जिल्ह्यातील आरोग्य आणि स्वच्छतेच्या मानकांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरल्या.

श्री विक्रम गुलाटी, कंट्री हेड आणि एक्झिक्युटीव्ह वाइस प्रेसिडेंट, कॉर्पोरेट अफेअर्स अँड गव्हर्नन्स, टोयोटास्क किर्लोरर मोट आभार व्यक्त करताना म्हणाले, “टीकेएम मध्ये, आम्हाला ‘स्वच्छ भारत’ उपक्रमांअंतर्गत सीएसआर टाइम्स अवॉर्ड 2024 मिळाल्याबद्दल अभिमान वाटतो. हा पुरस्कार प्रभावी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांद्वारे शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या टोयोटाच्या अटूट वचनबद्धतेचा पुरावा आहे. आमचा विश्वास आहे की खरा विकास हा सामाजिक प्रगतीशी खोलवर जोडलेला आहे. आमच्या लहान मुलापासून समाजापर्यंतच्या दृष्टीकोनाद्वारे, आमचे लक्ष नेहमीच सकारात्मक वर्तणुकीत बदल घडवून आणण्यावर असतो, जे दीर्घकालीन प्रभाव सुनिश्चित करते. समाजाशी जवळीक साधून, टिकावूपणा लक्षात घेऊन आम्ही आमचे कार्यक्रम त्यांच्या विशिष्ट गरजा आणि आव्हाने पूर्ण करण्यासाठी तयार करतो. स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने रायचूरमधील आमचे प्रयत्न, समाजातील जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आमचे समर्पण दर्शवते. स्वच्छ भारत मिशनमधील आमचे योगदान ओळखल्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समर्पित आहोत.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘वागले की दुनिया’च्या आगामी स्व-संरक्षण विषयक भागातून महिला सुरक्षेचा पुरस्कार

‘वागले की दुनिया’च्या आगामी स्व-संरक्षण विषयक भागातून महिला सुरक्षेचा पुरस्कार   सोनी…