
no images were found
भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेश
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पश्चिम नूतन जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव( प्रदेश सचिव), राहुल चिकोडे , विजय जाधव , राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यालय प्रवेश करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत फित कापून कार्यालय प्रवेश करण्यात आला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन नाईक-निंबाळकर, राहूल चिकोडे, के.एस चौगले, अलकेश कांदळकर संभाजी आरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टीने दिलेली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आगामी काळामध्ये पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत समन्वय साधून एकजुटीने काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भरतराव पाटील वसंतराव प्रभावळे, विलासराव बेलेकर, प्रा. धनाजी मोरुस्कर, देवराज बारदेस्कर, संतोष पाटील, नामदेव चौगले, रणजीत आडके, दिलीप मेत्रानी, भगवान काटे, डॉ आनंद गुरव, महेश चौगले, संदीप पाटील, मारुती परीतकर, नामदेव पाटील, उत्तमसिंग चव्हाण, विजयसिंह खाडे-पाटील, दीपक पाटील, अजित चव्हाण, दीपक शिरगावकर, किरण घाटगे, प्रीतम कापसे, सुलोचना नार्वेकर, झाकीर जमादार, संजय पाटील, भिकाजी जाधव, आनंदराव साने, राजेंद्र चौगले, नामदेव कांबळे, मुकुंद गावडे, विलास रणदिवे, राहुल चौगले, भगवान शिंदे, सुनील तेली, सुनील पाटील, विनायक परुळेकर, अशोक येलकर, अमोल पाटील, मोहन सूर्यवंशी, सुर्जन निंबाळकर, पांडुरंग वायदंडे, विलास राउत, मारुती पाटील, पी बी खुटाळे ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.