
no images were found
एचडीएफसी बँक करणार “मेगा ऑटो लोन मेला ”चे आयोजन
महाराष्ट्र, 26 ऑगस्ट, 2024:एचडीएफसी बँक, भारतातील आघाडीची खाजगी क्षेत्रातील बँक, महाराष्ट्रात 27-28 ऑगस्ट 2024 या कालावधीत दोन दिवसीय मेगा ऑटो लोन मेला चे आयोजन करणार आहे.पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा,सांगली,नाशिक,कराड आणि नागपूरसह महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये दोन दिवसीय या मोहिमेत २०० हून अधिक प्रादेशिक शाखा सहभागी होणार आहेत.
बँके ने अनेक अग्रगण्य ऑटो डीलरशिप्ससोबत भागीदारी केली आहे जी काही निवडक शाखांच्या ठिकाणी प्रीमियमपासून हॅच-बॅक सेगमेंटपर्यंतच्या कारचे नवीनतम मॉडेल प्रदर्शित करतील. उत्सवापूर्वीची मागणी पूर्ण करण्यासाठी गणपती उत्सवाच्या पूर्वी मेगा ऑटो लोन मेला चे आयोजन केले जात आहे.
मेगा ऑटो लोन मेला ड्राइव्हचे प्राथमिक उद्दिष्ट ग्राहकांना कार खरेदी प्रक्रियेसाठी एकाच ठिकाणी सर्व सोयी प्रदान करणे आहे. योग्य कारचा पर्याय शोधून निवडणे,टेस्ट -ड्राइव्ह मिळवणे आणि त्वरित कर्जाच्या दाव्यासह समाप्त करणे. हा कार्यक्रम खरेदीदारांना कार डीलर्सशी जोडण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे , तसेच या साठी एचडीएफसी बँक – एक्सप्रेस कार कर्जाद्वारे सुरळीत कर्ज वितरण सुनिश्चित करते, ही सुविधा सध्याच्या आणि संभाव्य एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
एक्सप्रेस कार लोन प्लॅटफॉर्म एक संपूर्ण डिजिटल,पेपरलेस आणि संपर्क-मुक्त प्रक्रिया आहे,ज्यामुळे डीलर्सना ऑटो कर्ज वाटप करता येते.फक्त 30 मिनिटांत.एचडीएफसी बँक एक्सप्रेस कार कर्जासह, ग्राहक कोणत्याही कागदपत्रांशिवाय आणि 100% डिजिटल प्रक्रिये द्वारे केवळ 30 मिनिटांत त्यांची ड्रीम कार प्रत्यक्षात खरेदी करू शकतो.
“एचडीएफसी बँक लोकांना सर्वोत्तम दर्जाची उत्पादने आणि सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. आमच्या ग्राहकांसाठी कार खरेदीचा अनुभव सुलभ करणारा एक अनोखा उपक्रम, कार लोन मेला आणण्यास आम्ही उत्सुक आहोत”, असे श्री अखिलेश कुमार रॉय, एचडीएफसी बँकेतील ऑटो लोन्सचे व्यवसाय प्रमुख म्हणाले. “भारतात कार खरेदी करणे हे कौटुंबिक प्रकरण आहे ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली जाते याकरिताच कार खरेदी प्रक्रियेला त्रासमुक्त अनुभव देण्याचा आमचा हा उपक्रम आहे.”