
no images were found
दहीहंडीनिमित्त शासनाच्या योजनांचा जागर; छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले होर्डिंग
कोल्हापूर (प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच घटकांकरीता जनकल्याणकारी योजना यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. राज्यातील जनतेला महायुती सरकारकडून देण्यात येत आलेल्या योजनांचा आलेख दिवसगणिक उंचावत आहे. दहीहंडी सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व असून, या सणाचे औचित्य साधून दरवर्षी शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. या दहीहंडी कार्यक्रमास शुभेच्छा देण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात लावलेल्या होर्डिंग वर शासनाच्या योजनांचा आलेख गोविंदाद्वारे दाखविण्यात आला असून, शासनाच्या योजनांचा जागरच एकप्रकारे या होर्डिंग द्वारे दाखविण्यात आला आहे