Home निधन वार्ता धामण समजून मण्यार सापाशी खेळताना सर्प मित्राचा अंत

धामण समजून मण्यार सापाशी खेळताना सर्प मित्राचा अंत

0 second read
0
0
101

no images were found

धामण समजून मण्यार सापाशी खेळताना सर्प मित्राचा अंत
वर्धा : मण्यार सापाला पकडल्यावर तो धामण आहे असे समजून त्याच्याशी खेळ करणे सर्प मित्राच्या जीवावर बेतलं आहे. वर्ध्याच्या सानेवाडी येथील प्रशांत काशीनाथ काकडे असं या सर्प मित्राचं नाव आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे.
प्रशांत (३५) हा सानेवाडी येथे राहणारा तरूण गेल्या १५ वर्षांपासून साप पकडतो, नेहमीप्रमाणे विक्रमशिला नगर येथे निघालेल्या सापाला त्याने पकडलं. रेस्क्यू केल्यावर त्याला सोडण्यासाठी जात असताना तो साप बॉटलमधून बाहेर पडला. त्यामुळे पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला आणि पकडल्यावर त्याच्याशी खेळ केला.
सापाला खिशात टाकून फिरण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. सापाशी खेळत असताना डाव्या हाताच्या बोटाला दंश झाला. पण या दंशाविषयी सर्पमित्राला कळलं देखील नाही. रात्री अचानक तब्येत बिघडली त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली. शेजाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या तरुणाला सापासोबत खेळणे चांगलचं जीवावर बेतलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…