
no images were found
शिवाजी विद्यापीठामध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी
शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागामार्फत भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बुधवार
दि. ९/०८/२०२३ रोजी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे औचीत्य साधून शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये सेट व नेट परीक्षेमध्ये यश
संपादन केलेल्या अधिविभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा अधिविभागामार्फत ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ग्रंथालय माहितीशास्त्र अधिविभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. एस. बी. पाटील, ज्ञान स्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. डी. बी. सुतार, सहाय्यक प्राध्यापक डॉ.
युवराज जाधव, उपग्रंथपाल डॉ. पी. बी. बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, अधिविभागातील सर्व संशोधक, बी.लीब.आय.एस्सी.,बी.लीब.आय.एस्सी. चे सर्व विद्यार्थी, अधिविभागातील प्रशासकीय कर्मचारी व ज्ञान स्त्रोत केंद्रातील सर्व वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.