Home शासकीय फाळणीच्या वेदना आजही क्लेश दायक : जिल्हाध्यक्ष विजय जाधव

फाळणीच्या वेदना आजही क्लेश दायक : जिल्हाध्यक्ष विजय जाधव

0 second read
0
0
28

no images were found

फाळणीच्या वेदना आजही क्लेश दायक : जिल्हाध्यक्ष विजय जाधव

 

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात “मेरी माटी, मेरा देश” संकल्पनेतून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने १४ ऑगस्ट विभाजन विभीषिका – फाळणी विभाजन दिनानिमित्त माहिती प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित कदम, करवीर नगर वाचन मंदिरचे डॉ.नंदकुमार जोशी यांच्या हस्ते फीत कापण्यात आली. यानंतर भारत मातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांसोबत सर्वांनी याठिकाणी लावलेली प्रदर्शनी पाहिली. याठिकाणी एकूण ५२ फोटोंच्या माध्यमातून फाळणीचा इतिहास मांडण्यात आला आहे.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, देशाचे विभाजन होणारा हा काळा दिवस आपण विसरू शकत नाही. या विभाजनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. या विभाजनात अनके लोकांचा मृत्यू झाला असून अशा लोकांचा संघर्ष आणि त्यांचे बलिदान आपण सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून आपल्याला भूतकाळातील अनेक गोष्टी समजूत येत असून हे प्रदर्शन दिनांक १४ पर्यंत खुले असून आपण सर्वांनी पहावे व इतरांना पाहण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, देश स्वतंत्र होऊनही आपण अनेक वर्षे मागासलेले राहिले परंतु पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या अंत्योदय विचारातून देशाची प्रगती सर्वांगीण प्रगती साधली आहे. फाळणीचा इतिहास देखील सर्वांना माहिती असला पाहिजे. ही फाळणी दुखाची आहे. ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांचे स्मरण कधी कॉंग्रेसच्या सरकाने केले नाही संकुचित वृत्तीने ठराविक लोकांनीच देशाला स्वतंत्र मिळवून दिले असे भासवून जनतेला कॉंग्रेस सरकारने भुलवले. मात्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या अनेक विस्मरणात गेलेल्या क्रांतीकारकांचा इतिहास जगा समोर आणला आहे.
माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, “मेरी माटी, मेरा देश” या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून त्यांनी आपल्या सर्वांना दिलेली पंचप्रण शपथ आपल्या आचरणात आणली पाहिजे असे आवाहन केले.
यानंतर सौ अश्विनी वळीवडेकर यांनी उपस्थितांना पंचप्रण शपथ दिली. याप्रसंगी सरचिटणीस हेमंत आराध्ये, दिलीप मेत्राणी, संजय जासूद, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, संजय सावंत, सचिन तोडकर, मंडल अध्यक्ष डॉक्टर राजवर्धन, सुधीर देसाई, रमेश दिवेकर, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत, कोमल देसाई, प्रमोदिनी हार्डीकर, जुईताई कुलकर्णी, विजयसिंह खाडे पाटील, विवेक वोरा, विशाल शिराळकर, महेश यादव, अनिल कामत, प्रसाद पाटोळे, अमेय भालकर, मानसिंग पाटील, दत्ता लोखंडे, महेश चौगुले, अमर साठे, संतोष माळी, सतीश आंबर्डेकर, अशोक लोहार, अनिरुद्ध कोल्हापुरे, महादेव बिरंजे, दिनेश पसारे, गौरव सातपुते, ओमकार गोसावी, हर्षद कुंभोजकर, क.न.वा.ग्रंथपाल सौ मनीषा तेनई यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…