Home सामाजिक माजी सैनिकांनी देशासाठी दिलेले योगदान वंदनीय – आ. ऋतुराज पाटील

माजी सैनिकांनी देशासाठी दिलेले योगदान वंदनीय – आ. ऋतुराज पाटील

12 second read
0
0
47

no images were found

माजी सैनिकांनी देशासाठी दिलेले योगदान वंदनीय – आ. ऋतुराज पाटील

-डीवायपी पॉली ग्रीन ब्रिगेडच्या वतीने स्वातंत्र्यदिनी सत्कार

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-माजी सैनिक आणि ऑफिसर्स यांनी देशासाठी दिलेले योगदान वंदनीय आहे. याबद्दल आम्ही  कायम आपल्या ऋणात राहू. येथून पुढील काळात आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने कार्यरत राहू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

      “डीवायपी पॉली ग्रीन ब्रिगेड” यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्याहस्ते आर्मड फोर्सेस ऑफिसर्स आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील बोलत होते. माजी सैनिकांनी देशसेवेत असतानाचे आपले रोमांचक अनुभव सांगितले. यावेळी रवींद्र पंडित यांनी देशभक्तीपर गीत सादर करून चैतन्य निर्माण केले.

       यावेळी कर्नल विलास सुळकुडे, मुरलीधर देसाई सर,हवालदार संजय माने,हवालदार विजय पाटील, हवालदार बसगोंडा पाटील,हवालदार नारायण पाटील, सुभेदार संजय खोत,सुभेदार अशोक माळी,मारुती पाटील,रविकुमार चव्हाण यांच्यासह माजी सैनिक तसेच डी .डी.पाटील उपस्थित होते. 

डी. वाय. पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय कुलकर्णी, समीक्षा पारखे, समृद्धी मेटील,वैष्णवी पार्टे यांच्यासह ग्रीन ब्रिगेडच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …