Home आरोग्य खुपीरे ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू करा – मंत्री प्रकाश आबिटकर

खुपीरे ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू करा – मंत्री प्रकाश आबिटकर

30 second read
0
0
7

no images were found

खुपीरे ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू करा – मंत्री प्रकाश आबिटकर

गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना : करवीर मतदार संघातील आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा

मुंबई, :  कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे घेण्यात आला. 

         यावेळी खुपीरे ग्रामीण रुग्णालयातील डायलेसिस सेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  बैठकीत खुपीरे ग्रामीण रुग्णालयातील सद्यस्थिती, आवश्यक सुविधा, मनुष्यबळ तसेच वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेबाबत मंत्री आबिटकर यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी स्त्रीरोग तज्ञ दंतविकार तज्ञ यांच्या जागा तातडीने  उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि स्थानिक पातळीवर उपचार सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.

       या बैठकीत गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील पायाभूत सुविधा, इमारतीची सद्यस्थीती आवश्यकता, रिक्तपदे आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना मंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शासनाच्या रुग्णालयात जन आरोग्य योजनेचे कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या सूचना दिली

       करवीरचे आमदार श्री. चंद्रदीप नरके यांनी खुपीरे येथे नवीन डायलेसिस युनिटसाठी सुसज्ज इमारत उभारण्याबरोबरच आवश्यक वैद्यकीय उपकरणांची मागणी करणारे  निवेदन सादर केले. यासोबतच गगनबावडा ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबतही मागणी करण्यात आली.

        गगनबावडा ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले. तसेच सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या काम वाढावे व रुग्णांना आपल्या गावा जवळ मोफत सुविधा उपलब्ध करून  देणेसाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

       बैठकीस आमदार करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, आरोग्य साचिव ई. रवींद्रन ,  आरोग्य सेवा आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉक्टर विजय कंदेवाड, कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थिती होते. कोल्हापूर परिमंडळ उपसंचालक दिलीप माने व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान -सिम्युलेशन शिक्षण क्…