no images were found
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्यावतीने शहरात तिरंगा बाईक रॅली
कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत असून यानिमित्त महापालिकेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्यावतीने शहरातील मुख्य मार्गावरून बाईकवरुन तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या तिरंगा रॅलीची सुरुवात ताराबाई पार्क येथील सासने मैदान येथून प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे उपस्थित होते. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी म्हणाल्या दि.15 ऑगस्ट 2024 च्या आधिपासून सर्वांनी आपआपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवावा. आपण भारतीय आहोत याचा सर्वांना गर्व आहे. आपला पुढच्या पिढीला स्वातंत्र्याबद्दल माहिती व्हावी म्हणूनच केंद्र शासन व राज्य शासनाने हर घर तिरंगा हा उपक्रम राबविला आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने विविध कार्यक्रम आयोजीत केले आहेत. तिरंगा सेल्फी पॉईट शाळेत व महापालिेच्या कार्यालयात केले आहेत. तिरंगा रॅली, रांगोळी स्पर्धा, तिरंगा कॅनवास, पेंटिंग, बचत गटांचे स्टॉल्स असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सर्व अग्शिनम जवान व ऑल इंडिया इंन्स्टीट्यूट फायर ट्रेनिंगचे विद्याथ्यांनी बाईकवरुन हि रॅली सासने मैदान ते धैर्यप्रसाद चौक ते कावळा नाका ते एसटी स्टॅण्ड ते दाभोळकर कॉर्नर ते व्हिनस कॉर्नर ते विल्सन पूल ते रिलायन्स मॉल ते उमा टॉकीज चौक ते सावित्रीबाई फुले हॉस्पीटल ते शिवाजी स्टेडियम ते मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार रोड ते पापाची तिकटी ते महापालिका मुख्य इमारत या मार्गावरुन काढण्यात आली. यावेळी या रॅलीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.
या रॅलीमध्ये स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, जयवंत खोत, ओंकार खेडकर, अग्निशमन विभागाकडील 50 जवान,ऑल इंडिया इन्स्टिट्यूटच्या फायर ट्रेनिंगचे 30 विद्यार्थी, खराडे कॉलेज ऑफ फायर ट्रेनिंगचे 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.