Home Uncategorized सिम्बॉयसिस एमबीए प्रवेश आता SNAP टेस्ट २०२४ च्या माध्यमातून खुले

सिम्बॉयसिस एमबीए प्रवेश आता SNAP टेस्ट २०२४ च्या माध्यमातून खुले

28 second read
0
0
23

no images were found

सिम्बॉयसिस एमबीए प्रवेश आता SNAP टेस्ट २०२४ च्या माध्यमातून खुले

 

 

 

 सिम्बॉयसिस एमबीए प्रोग्रामसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया सिम्बॉयसिस नॅशनल अॅप्टिट्युड टेस्ट (SNAP) २०२४  च्या माध्यमातून अधिकृतरित्या सुरू करण्यात आली आहे. भारतात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी ५ ऑगस्ट २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणी प्रक्रिया, पात्रता निकष आणि इतर आवश्यक माहितीसाठी इच्छुकांनी official SNAP website येथे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कृपया नोंद घ्या, परीक्षेसाठीचे शहर आणि तारीख प्रथम फॉर्म घेणऱ्यास प्रथम सेवा तत्वावर देण्यात येतील.

 

 

 

२०२४ साठीची एसएनएपी कम्प्युटर-बेस्ड टेस्ट (CBT) तीन वेगवेगळ्या तारखांना होईल: ८ डिसेंबर २०२४ (रविवार), १५ डिसेंबर २०२४ (रविवार)  आणि २१ डिसेंबर २०२४ (शनिवार.) एसएनएपी २०२४ चे बहूप्रतिक्षित निकाल ८ जानेवारी २०२५ (बुधवार) रोजी जाहीर होतील.

 

या आगामी परीक्षेतून महत्त्वाकांक्षी उमेदवारांना एकाच अर्जातून सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) अंतर्गत १७ संस्थांमधील २७ अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

 

ही परीक्षा भारतभरात ८० शहरांमध्ये घेतली जाईल आणि उमेदवारांना तीन संधी दिल्या जातील. “बेस्ट ऑफ थ्री” तत्वानुसार यातील सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जातील. प्रत्येक वेळेसाठी २२५० रु. नोंदणी शुल्क असेल. तसेच अर्ज केलेल्या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी अतिरिक्त १००० रु. भरावे लागतील.

 

सिम्बॉयसिस नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट (एसएनएपी)साठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून किंवा राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेतून किमान ५० टक्के (अनूसुचित जाती/जमातींसाठी ४५ टक्के) गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. शेवटच्या वर्षात असणारे अंडरग्रॅज्युएट विद्यार्थीही अर्ज करू शकतात. मात्र, त्यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळवणे गरजेचे आहे. परदेशी विद्यापीठातील इच्छुक उमेदवारांकडे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) चे समतूल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (डिम्ड युनिव्हर्सिटी)शी संलग्न विविध ख्यातनाम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग एसएनएपीमुळे खुला होतो. यात विविध प्रकारचे एमबीए अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एसएनएपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत करणाऱ्या ख्यातनाम संस्थांमध्ये SIBM Pune, SICSR, SIMC, SIIB, SCMHRD, SIMS, SIDTM, SCIT, SIOM, SIHS, SIBM Bengaluru, SSBF, SIBM Hyderabad, SSSS, SIBM Nagpur, SIBM NOIDA आणि and SSCANS. या संस्थांचा समावेश आहे. बिझनेस आणि मॅनेजमेंटच्या करिअरसाठी महत्त्वाकांक्षी प्रोफेशनल्सना या परीक्षेच्या माध्यमातून एक नवा मार्ग आखता येतो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…