Home आरोग्य इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये  सुपर इंडक्टिव्ह सिस्टीम चे अनावरण

इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये  सुपर इंडक्टिव्ह सिस्टीम चे अनावरण

4 second read
0
0
42

no images were found

इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये  सुपर इंडक्टिव्ह सिस्टीम चे अनावरण

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमध्ये इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन या सेंटरच्या माध्यमातून गेली २५ वर्षे कार्यरत असणाऱ्या डॉ.प्रांजली अमर धामणे यांनी आपली फिजिओथेरपीची सेवा अविरत पणे सुरू ठेवली आहे. आता त्यांनी आपल्या या संस्थेत सुपर इंडक्टिव्ह सिस्टीम हे नवे उपकरण कोल्हापूरमध्ये प्रथमच आणले आहे, ज्याद्वारे फिजिओ थेरेपी करण्यास आणखी मदत होणार आहे या नव्या उपकरणाचे आणि इन्स्टिट्यूटचे नाव ‘आरोग्यती फिजिओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’ असे नामांतर केले आहे. याचे अनावरण रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन च्या कोल्हापूर अध्यक्षा सौ.अरूंधती महाडिक यांच्या प्रमुख हस्ते महाराजा बँक्वेट हॉल येथे येत्या १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे अशी माहिती डॉ.प्रांजली धामणे आणि डॉ.मनीषा जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.शिवाय यावेळी रीहँबिलिटेशन सर्व्हिसेस हॉस्पिटल ठाणेचे डॉक्टर.अमित धुमाळे (MBBS, DNB Ortho) हे मार्गदर्शन करणार आहेत.
१९९३-९७ या कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमधून येथे शिक्षण घेतलेल्या डॉ.प्रांजली धामणे यांनी १९९८ कोल्हापूरमध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी रोटरी फिजिओथेरेपी, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल, डॉ.किरण दोशी, डॉ.संतोष प्रभू, डॉ.पी.जी.कुलकर्णी
याठिकाणी सेवा दिली. हा अनुभव गाठीशी ठेऊन त्यांनी २००७ पासून आपले इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन हे सेंटर १२०० स्कवेर फूट जागेत सुरू केले.
२००९ मध्ये भारतात आणि कोल्हापुरात प्रथमच मॅट्रिक्स रीदम थेरपी हे उपकरण आणले प्रगत जर्मन तंत्र सादर करणाऱ्या त्या पहिली व्यक्ती आहेत.जे रुग्णांच्या स्नायूंना खोलवर मोकळे करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.
चांगल्या स्नायूंचे संरक्षण करण्यासाठी व दुखापत झालेल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच पेशींच्या पुनर्निर्मिती करण्याचे
२०१६ मध्ये मॅग्नेटोडीन थेरपी आणि २०१९ मध्ये क्लास फोर लेझर (सर्व जर्मन उपकरणे) सादर केली.
शिवाय क्लास फोर लेसर,कपिंग थेरेपी,ड्राय निडलिंग थेरेपी,ऑस्टीओपँथी, कायरोथेरेपी अशा सुविधा दिल्या जातात. आणि आता ‘सुपर इंडॅक्टिव्ह सिस्टीम’ उपकरण आणले आहे ज्याद्वारे अधिक सेवा देण्यास मदत होणार असल्याचे डॉ.प्रांजली धामणे यांनी सांगितले.
त्या शाळा, महाविद्यालये, उद्योग किंवा संस्थांसारख्या विविध प्लॅटफॉर्मवर फिजिओथेरपी किंवा फिटनेसचे महत्त्व याबद्दल ८० हून अधिक कार्यक्रम आणि शिबिरे सक्रियपणे आयोजित केले आहेत. त्यांच्या २५ वर्षांच्या सरावात फिजिओथेरपीमधील प्रगत तंत्रे आणि कौशल्ये शिकण्यासाठी आणि अवलंबण्यासाठी ५० शैक्षणिक कार्यशाळांमध्ये सक्रियपणे त्या सहभागी होत आहेत.अलीकडेच त्यांनी FOMT (ऑस्टियोपॅथी आणि मॅनिपुलेटिव्ह थेरपीमध्ये फेलोशिप) मिळवली आहे. आणि कॅनडामधील ओंटारियो विद्यापीठात ऑस्टियोपॅथीमध्ये डिप्लोमा केला आहे.त्यासोबतच ती ७ ते ८ वर्षांपासून मॅरेथॉनमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत आणि त्यांच्या टीमद्वारे फिजिओ सपोर्टही देत ​​आहेत. दैनंदिन जीवनात महिलांचे आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबतही ती महिलांमध्ये जागरुकता निर्माण करत आहेत.
या सेंटरमध्ये मानदुखी, रिस्ट ड्रॉप, टाचदुखी, वृद्धापकाळातील आजार, श्वसन विकार, पाठदुखी,कंबरदुखी, लहान मुलांचे आजार,हाडांचे दुखणे संबंधित आजार, खांधेदुखी, फ्रॅक्चर ऑपरेशन नंतर येणारा कडकपणा, मेंदू व मणक्याचे आजारपणा नंतरचे उपचार, टेनिस एल्बो, गुडघेदुखी, लकवा, बेल्स पाल्सी आदी परिस्थितीवर उपचार केले जातात.शिवाय आहार तज्ञांचा व मानसोपचार तज्ञांचा सल्ला दिला जातो.भविष्यात निवासी सुविधा आणि मोबाईल व्हॅन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ.प्रांजली धामणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या सेंटरमध्ये सहा
फिजीओथेरेपिस्ट,चार असिस्टंट आणि दोन मॅनेजर अशी टीम कार्यरत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…