
no images were found
फ्लिपकार्टने जारी केला फ्लिपट्रेंड्स 2024 चा अहवाल- कोट्यवधी भारतीय नक्की काय विकत घेतात?
बंगळुरू– ऑगस्ट 6, 2024- या वर्षीच्या सणावाराच्या मोसमाच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने त्यांच्या बहुचर्चित फ्लिपट्रेंड्स या त्यांच्या अहवालातील एच१ आवृत्ती (जानेवारी ते जून २०२४) सादर केली आहे. त्यात फ्लिपकार्टचे ५० कोटी ग्राहक नक्की काय खरेदी करतात, तसंच त्यांच्या शॉपिंगबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
टियर ३+ भागात सर्वांत लोकप्रिय काय आहे? या भागातल्या लोकांच्या शॉपिंगच्या कोणत्या सवयी इतर प्रदेशापेक्षा वेगळ्या आहेत?
२०२४ मध्ये विशिष्ट काळात लोकांनी कोणती अनपेक्षित खरेदी केली?
एखाद्या विशिष्ट काळात काही ट्रेंड्स असतात की वर्षभर चालणाऱ्या ट्रेंड्सचा दबदबा असतो?
या सर्व काळात विशिष्ट उत्पादन ग्राहकांनी जास्त प्रमाणात खरेदी केलं का?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरं फ्लिपकार्टने सादर केलेल्या फ्लिपट्रेंड्स या अहवालात देण्यात आली आहेत.
फ्लिपट्रेंड्स अहवालात ग्राहकांच्या शॉपिंग ट्रेंड्सबद्दल महत्त्वाची माहिती आहे- काही माहिती अपेक्षित आहे तर काही माहिती अतिशय धक्कादायक आहे.
फ्लिपट्रेंड्स २०२४ ची महत्त्वाची माहिती
इंडिया का लाइफस्टाइल अँड फॅशन डेस्टिनेशन – प्रत्येकासाछी इथे काही ना काही उपलब्ध आहे.
२०२४ च्या पहिल्या काही महिन्यात विशेषत: उन्हाळ्यात ‘व्हेकेशन वेअर्स’ हा सर्वांत जास्त शोधला गेलेला शब्द होता. स्त्रियांनी त्यांच्या निवडीत वैविध्य दाखवलं आणि कोणताही एक ट्रेंड फॉलो केला नाही. विचित्र प्रकारचे बो, रोझेट टॉप्स, चिक बंदाऊ टॉप्स, ड्रेसेस, ८० च्या दशकाने प्रेरित स्क्रंचिज, पेस्टल कलर्सच्या वस्तू घेतल्या. पुरुषांनी गोल गळ्याचे टी शर्ट, ओपन नीट आणि टेक्श्चर्ड शर्ट, झिपर पोलो, पॅराशूट ट्राऊझर्सची निवड केली. त्याशिवाय अतिशय आरामदायी कपड्यांची निवड पुरुषांनी केल्याचं दिसून आलं. त्यात प्रिंटेड को-ऑर्ड सेट्स, हवेशीर समर शर्ट्स यांचा समावेश होता. पुरुषांच्या सौंदर्यप्रसाधनात सुद्धा २०२३ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.महिलांचे वेस्टर्न वेअर्स आणि एथनिक वेअर्सना बंगलोर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि नवी दिल्ली मध्ये पसंती मिळाली. तर अगरतला, भागलपूर, मेदिनीपूर, मुझफ्फरपूर आणि पूरी या शहरात साड्यांना पसंती मिळाली. परंपरेचा विचार करता सिंदूर च्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली
आधुनिक तबकात पारंपरिक चव
सगळीकडे उत्तमोत्तम चवीचं आणि फ्यूजन फुड्सचा बोलबाला असताना आपली पारंपरिक चव कशी मागे राहील? यावर्षी भारतीयांना त्यांच्या पारंपरिक रेसिपीबद्दल पुन्हा आवड निर्माण झाली आहे. लोकांनी पुन्हा एकदा लोणची आणि चटण्या साठवायला सुरुवात केली आहे. २०२३ च्या तुलनेत लोणचे आणि चटणी या वर्गाची वार्षिक वाढ ९० टक्क्यापर्यंत झाली आहे.पदार्थांबद्दल बोलायचं झालं तर फुड अँड न्यूट्रिशन ही वर्गवारी भुवनेश्वर, कटक, देहारादून, गोरखपूर, गुवाहाटी या शहरात आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय उन्हाळ्याचा सामना कसा करत आहेत?
वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी ग्राहक आरामदायी आणि फ्रेशनेसला प्राधान्य देक आहेत. पंख्यांच्या खरेदीत मागील वर्षांच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गारवा लोकांसाठी अतिशय गरजेचा झाला आहे. सनस्क्रीनच्या विक्रीचत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण हा आता लोकांचा प्राधान्यक्रम झाला आहे. एअर कुलर्स सुद्धा उष्णतेपासून बचाव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या विक्रीत सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा ६४ टक्क्यांची वाढ झाली आहे. हेअर ऑइल, फेस वॉश, शॅम्पू, डिओड्रंट्स, या वस्तूंच्या मागणीला बंगलोर, भुवनेश्वर, कटक, गोरखपूर, हैदराबाद, कोलकाता आणि नवी दिल्ली या शहरातून मागणी वाढली आहे.
पावसाळ्यातील मागण्या
मान्सूनच्या तयारीसाठी दुकानदारांनी छत्र्या, रेनकोट आणि मॉस्किटो वेपोरायझर्सचा साठा करून ठेवला होता. सौंदर्यप्रसाधनं आणि स्किनकेअरची उत्पादनं ही फ्लिपकार्टच्या ग्राहकांना वर्षभर हवी असतात. मेकअप किट्स आणि सुगंधी द्रव्यांची लोकप्रियता पावसाळा येता येता वाढली आहे.
स्मार्टवॉचला वाढती मागणी
नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान असलेल्या गोष्टींना मागणी वाढल्याचं फ्लिपट्रेंड्समध्ये लक्षात आलं आहे. फिटनेसवर विशेष लक्ष असलेल्या लोकांपासून ते फॅशनप्रिय, तसंच ज्या व्यावसायिक लोकांना जगाशी कनेक्ट राहण्याची सातत्याने गरज असते अशा सर्व वर्गातील लोकांकडून स्मार्टवॉचची मागणी वाढली आहे. त्यामुळे २०२४ मध्ये वेअरेबल टेक ट्रेंड्स या वर्गात स्मार्टवॉचने अव्वल स्थान पटकावलं आहे. तसंच स्मार्ट बँड आणि टीडब्ल्यूएस इअरफोन्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गॅजेट सुरक्षित ठेवण्याची धडपड
टियर ३+ मार्केट्समध्ये ७२ टक्के ग्राहकांनी मोबाइल फोनचं संरक्षण करण्यास प्राधान्य दिलं आहे. मोबाइल फोनमध्ये बरीच गुंतवणूक केल्यामुळे त्याचं रक्षण करणं क्रमप्राप्त आहे. डेटा संरक्षण, टिकाऊपणा आणि रिसेल किंमत चांगली यावी यासाठीसुद्धा हे संरक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. भुवनेश्वर, कटक आणि गुवाहाटी या टिअर 2 शहरांनी या वस्तूंना अतिशय प्राधान्य दिलं आहे. तसंच अगरतला, मेदिनापूर, मुझफ्फरपूर या टिअर 3+ शहरांनी दणकट हँडसेट आणि मोबाइल प्रोटेक्शन केस ला प्राधान्य दिलं आहे.
खेळांचा आणि सणावारांचा उत्साह
खेळाला अनेक भारतीयांच्या नात वरचं स्थान आहे. लोकप्रिय क्रीडा स्पर्धांच्या वेळी लोकांनी केलेल्या खरेदीवरूनही ते पुरेसं स्पष्ट होतं. टेनिस किट्स स्पोर्ट्स मर्चंडाईज, पुरुषांचे ट्रॅकसुट्स यांची मागणी वाढली होती. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी लोकांनी ही खरेदी केली.
सणावारांमुळेही मागणीत प्रचंड वाढ झाली. पारंपरिक वेशभुषा तसंच पूजेसाठी लागणारं साहित्य या वस्तूंना नवरात्र, उगादी, ईद-उल-फित्र या काळात मागणी वाढली होती. सिंदूर, हवन चौकी, आणि दिवे यांची मागणी नवरात्रीच्या वेळी प्रचंड प्रमाणात वाढली होती.
फ्लिपट्रेंड्स अहवाल २०२४ च्या अहवालाबदद्ल बोलताना फ्लिपकार्टच्या अनालिटिक्स आणि डेटा सायन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवी विजयराघवन म्हणाले, “ ग्राहक त्यांच्या आवडीनिवडीबद्दल अतिशय सजग झाले आहेत. मोसमाप्रमाणे आणि वैयक्तिक आवडीनिवडीप्रमाणे ते खरेदी करतात. फ्लिपट्रेंड्स एच १ २०२४ हा अहवाल सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या अहवालात शॉपिंग ट्रेंड्स तर कळतातच पण त्याच बरोबर इ-कॉमर्स क्षेत्राच्या वाढीसाठी किती संधी आहेत हेही या निमित्ताने दिसून येते. आमच्यासाठी ग्राहक कायमच केंद्रस्थानी असतो. त्यांच्या विविधांगी मागण्या ओळखून त्या पूर्ण करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आता सणावारांचे दिवस येताहेत. त्यामुळे आमच्या ग्राहकांचा विश्वास, सोय आणि खरेदी करण्याची क्षमता यात वाढ व्हावी असा आमचा उद्देश आहे. फ्लिपकार्ट या सर्व गरजा पूर्ण करेल याची आम्ही काळजी घेऊ. फ्लिपट्रेंड्सच्या अहवालातून महानगरं आणि टियर ३+ भागात फ्लिपकार्टलाच शॉपिंगसाठी प्राधान्य देतात हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.