no images were found
कै.मंगेशराव कुलकर्णी स्मृती ‘पायोनियर चषक’ बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉलमध्ये आज संपन्न झालेल्या कै. मंगेशराव (गणेश) कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटेने अपेक्षेप्रमाणे सहजतेने अजिंक्यपद पटकाविले.अंतिम आठव्या फेरीत पहिल्या पटावर सात गुणासह आघाडीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद विरुद्ध सहावा मानांकित सातारचा अनिकेत बापट यांच्यातील लढतीत दोघांनी कोणताही धोका न पत्करता झटपट डाव बरोबरीत सोडविला.या बरोबरीमुळे सम्मेद साडेसात गुणासह अजिंक्य ठरला त्याला रोख 7000 रुपये व पायोनियर चषक देऊन गौरवण्यात आले.दुसऱ्या पटावर देखील सातारचा ओंकार कडव विरुद्ध सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण यांच्यातील डावही बरोबरीत सुटला.तिसऱ्या पटावर इचलकरंजीच्या रवींद्र निकम ने गोव्याच्या विल्सन क्रूझवर मात करून सात गुणासह उपविजेतेपद पटकाविले.रवींद्रला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.चौथ्या पटावर जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ने कोल्हापूरच्या सोहम खासबारदार वर विजय मिळवला.पाचव्या पटावर मिरजेच्या मुद्दसर पटेल ने गोव्याच्या प्रदीप कुलकर्णीला हरविले.सहाव्या पटावर जयसिंगपूरच्या दिशा पाटील वर कोल्हापूरच्या तुषार शर्माने मात केली.दिव्या पाटील, मुदस्सर पटेल, अनिकेत बापट, ओंकार कडव, विक्रमादित्य चव्हाण व तुषार शर्मा या सर्वांचे समान साडेसहा गुण झालेमुळे सरस 43 बकोल्झ टायब्रेक गुणानुसार सातारच्या ओंकार कडवने बाजी मारली व तृतीय स्थान पटकावले त्याला रोख चार हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. इतर बक्षिसे अनुक्रमे 4)अनिकेत बापट सातारा 5) विक्रमादित्य चव्हाण सांगली 6)दिव्या पाटील जयसिंगपूर मुद्दसर7) मिरज व 8) तुषार शर्मा कोल्हापूर 9) प्रणव पाटील कोल्हापूर 10) सारा हरोले सांगली 11) सोहम खासबारदार कोल्हापूर 12) विल्सन क्रूझ गोवा 13) संतोष कांबळे कोल्हापूर 14) आयुष महाजन कोल्हापूर 15) अनिकेत काटे कोल्हापूर 16) अमित मुडगुंडी सोलापूर17) संतोष सरीकर इस्लामपूर 18) अब्दुल लतीफ हैदराबाद 19) आदित्य सावळकर कोल्हापूर 20) वरद आठल्ये कोल्हापूर 21) मनीष देशपांडे कोल्हापूर..
स्पर्धेचा बक्षीस समारंभ न्यू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन निर्मलकुमार लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी व्यासपीठावर पायोनियर चे संचालक महेश कुलकर्णी, श्रीमती आशा मंगेशराव कुलकर्णी, मधुरा कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारूलकर, धीरज वैद्य उपस्थित होते.मंजिरी लिंगनूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आरती मोदी,करण परीट,प्रशांत पिसे,अभिजीत चव्हाण,विजय सलगर,किरण शिंदे,योगिता कुलकर्णी,विभूषा कुलकर्णी, जयसिंग पडवळ व जितेंद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले.
उत्तेजनार्थ बक्षीस हे पुढील प्रमाणे
साठ वर्षावरील उत्कृष्ट जेष्ठ बुद्धिबळपटू
1) प्रदीप कुलकर्णी गोवा 2) माधव देवस्थळे कोल्हापूर 3) अशोक माने कसबे डिग्रज 4) दिलीप सूर्यवंशी सांगली
उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू
1) दिशा पाटील जयसिंगपूर 2) सिद्धी कर्वे जयसिंगपूर 3) सृष्टी कुलकर्णी इचलकरंजी 4) सृष्टी जोशीराव कोल्हापूर 5) माधवी देशपांडे सांगली 6) अन्वी कुणाळे सांगली 7) धनश्री पोर्लेकर इचलकरंजी 8) सृष्टी पवार कोल्हापूर 9) वेदिका मदने कोल्हापूर 10) हर्षला पडवळे गगनबावडा
उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू
1) शिवम केशरवाणी इचलकरंजी
पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) अरीन कुलकर्णी कोल्हापूर 2) स्वरूप साळवे गडहिंग्लज 3)मानस महाडेश्वर कोल्हापूर 4) प्रणव मोरे कोल्हापूर 5) अथर्व अलदार सांगली 6) आदित्य कोळी इचलकरंजी 7) विवेक पवार वारणानगर 8) शार्दुल जौंजाळ कोल्हापूर 9) किरण पवार वारणानगर 10) चिन्मय टिपूगडे चिपळूण
तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) सर्वेश पोतदार कोल्हापूर 2) सौमित्र केळकर सांगली 3) सिद्धी बुबणे नांदणी 4) स्नेहल गावडे कोल्हापूर 5) मन्वित कांबळे कोल्हापूर 6) संस्कार काटकर कोल्हापूर 7) अनुष खोत कोल्हापूर 8) योगदृम माने संजय घोडावत 9) तरुण गिरमल जयसिंगपूर 10) आराध्य पवार कोल्हापूर
अकरा वर्षाखालील ऊत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) शौर्य बगाडिया इचलकरंजी 2) अर्णव पोर्लेकर कोल्हापूर 3) प्रेम निचल सेनापती कापशी 4) स्पर्श लहाने कोल्हापूर 5)अवनीत नांदणीकर सांगली 6) आरव पाटील कोल्हापूर 7) अन्वेष भिवरे कोल्हापूर 8) आदित्य घाटे कोल्हापूर 9) वेदांत बांगड इचलकरंजी 10) आशिष मोटे सांगली
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) दिवीज कात्रुट कोल्हापूर 2) अवनीश जितकर कोल्हापूर 3) सांची चौधरी इचलकरंजी 4) रुद्रवीर पाटील कोल्हापूर 5) विवान अस्पतवार गगनबावडा 6) कैवल्य पाटील वारणानगर 7) शौर्य नांगरे सांगली 8) अर्णव जोशी कोल्हापूर 9) ऋतुराज पाटील इचलकरंजी 10) सर्वेश गावडे कोल्हापूर
सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) आदिराज डोईजड वारणानगर 2) अवनीश पाटील कोल्हापूर 3) वृशांक माने कोल्हापूर 4) जयवर्धन भोसले कोल्हापूर 5) चार्मी शहा इचलकरंजी