no images were found
सिद्धगिरी गुरुकुलच्या विद्यार्थी निर्मित पर्यावरण पूरक गणेश मुर्त्या पालकमंत्री मुश्रीफ आणि प्रशासकीय अधिकारांना भेट
कोल्हापूर – सिद्धगिरी कणेरी मठ येथील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पूर्ण पर्यावरण गणेश मुर्त्या आज जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल येडगे ,जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित , जिल्हा परिषद सीईओ एस . कार्तिकेयन , इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदि ना भेट देण्यात आल्या . कणेरी मठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर आणि गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी या गणेश मुर्त्या सस्नेह भेट दिल्या .भविष्यात या पर्यावरणपूर्वक उपक्रमाची व्याप्ती तालुकास्तरीय विविध शाळा मधून वाढवावी अशी सूचना पालकमंत्री यांनी यावेळी केले . यावेळी महेश मास्तोळी , आरोग्य मित्र राजेंद्र मकोटे आणि समन्वय महादेव शिर्के उपस्थित होते आगामी काळात कोल्हापूर शहरातील विविध प्रमुख ठिकाणी तसेच सांगली सातारा या ठिकाणीही या मुर्त्या गणेश भक्तांसाठी उपलब्ध असणार आहे अगोदर गणेश मुर्ती आरक्षित करण्यासाठी गणेश फक्त आणि सिद्धगिरी कणेरी मठ आणि तसेच सिद्धगिरी गुरुकुल येथे महादेव शिर्के ( 9892773809 ) या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन यशोवर्धन बारामतीकर यांनी केलेले आहे . .