no images were found
पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प परिसराती 228 नागरीकांचे स्थलांतर
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):- जिल्ह्यामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा रात्रदिवस काम करत असून पूर बाधीत क्षेत्रातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प या परिसरातील 228 नागरीकांचे करण्यात आले आहे. यामध्ये 56 कुटुंबातील 116 पुरुष, 112 महिला व 41 मुलांचा समावेश आहे. तर आज महापालिकेच्या निवारा केंद्रात 31 कुटुंबातील 52 पुरुष, 53 महिला व 14 मुले असे 105 नागरीकांचे स्थलांतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत झाले आहे. या सर्व निवारा केंद्रातील स्थलांतरीत कुटुंबांना महापालिकेच्यावतीने नाष्टा, चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने वैद्यकीय टिम दैनंदिन तीन वेळा या मठामध्ये येऊन वैद्यकीय तपासणी करुन नागरीकांना मोफत औषधे देत आहे.
त्याचबरोबर शहरामध्ये आज रेसकोर्स नाका येथे 1 झाडे पडली असून प्रतिभानगर येथे 1 झाडे, रुईकर कॉलनी येथे 1 झाड, पुईखडी येथे 1झाड, साळुंखेनगर येथे 1 झाड, राजारामपुरी 5 वी गल्ली व 10 वी गल्ली येथे 1 झाड, जिल्हाधिकारी निवासस्थान येथे 1 झाड, पडले असून ते उद्यान व अग्निशमन विभागाच्यावतीने कटींग करुन रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. तर विभागीय कार्यालय क्र.2 मध्ये मंगळवारपेठ येथील शिंदे गल्लीतील एका घराची भिंत व डी वॉर्ड येथील भुसार गल्लीतील पडक्या घराची भिंत पडलेली आहे.