
no images were found
के.एम.सी. कॉलेज व गोखले कॉलेज यांच्या वतीने कारगिल विजय दिन सादरा
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-: कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंत चव्हाण (के.एम.सी) कॉलेज व गोपाळकृष्ण गोखले कॉलेज यांच्यावतीने आज कारगिल विजय दिन यशवंतराव चव्हाण (के.एम.सी) कॉलेजमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिन हा कार्यक्रम कोल्हापुरातील महापूर स्थितीमुळे ऑफलाइन व ऑनलाईन अशा पद्धतीने घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये वाय सी के एम सी कॉलेजचे एनसीसी विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व जी के जी कॉलेज, शाहू दयानंद हायस्कूल, इंदिरा गांधी स्कूल, जय हनुमान हायस्कूल, इस्पुरलीचे एनसीसी कॅडेट, ५६ महाराष्ट्र बटालियनचे ए एन ओ यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. कारगिल विजय दिन हा भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक असल्याचे मनोगत व कारगिल युद्धाची माहिती कॅप्टन डॉ.अमित रेडेकर यांनी आपल्या व्याख्यानातून दिली. यावेळी कारगिल युद्धाची माहितीहि चित्रफितीच्या आधारे त्यांनी दाखविली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब उलपे यांनी कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय सैनिकांना व्याख्यानातून आदरांजली वाहिली. तसेच लेफ्ट डॉ. डि के नरळे यांनी या कार्यक्रमानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रा. रविंद्र मांगले यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन कॅप्टन डॉ. अमित पुंडलिक रेडेकर, लेफ्ट डॉ. डि के नरळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे, प्राचार्य डॉ. आर बी भुयेकर यांचे सहकार्य लाभले. ५६ महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगिया, ऍडमिनिस्टिटी ऑफिसर व पीआय स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.