Home शासकीय भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

9 second read
0
0
42

no images were found

भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

 

कोल्हापूर  : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील मान्यता प्राप्त महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या समाजातील केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या परंतू शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी ही योजना आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी भटक्या जमाती -क प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत आणि व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाकरीता 25 जुलै 2024 पर्यंत  ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.

 योजनेकरीता इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाख पेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष भोजन, निवास व निर्वाह भत्त्यासाठी एकूण 43 हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 38 हजार रुपये प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.

योजनेंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150, व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 अशा एकूण 600 विद्यार्थ्यांची लाभाकरीता निवड केली जाणार आहे. तसेच प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले 150 विद्यार्थ्यांनाही त्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 21 जून 2024 च्या शासन निर्णयनुसार लाभ देण्यात येणार आहे.

 योजनेसाठी मुलभूत पात्रता, शैक्षणिक निकष व  इतर निकष पुढीलप्रमाणे-

1) विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे.

2) विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा आदिवास, रहिवाशी असल्याबाबतचा तहसिलदार यांच्याकडील दाखला,  व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस या योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPA गुण असणे आवश्यक राहील, दिव्यांग विद्यर्थ्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक, तसेच लाभ मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75 टक्के असावी. योजनेतंर्गत सन 2024-25 करिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना, व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थी अशा रितीने प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

3) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला भटक्या जमाती-क प्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असले. या योजनेंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70 टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व 30 टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील. विद्यार्थ्यांस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.

4) विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. (तहसिलदार यांचेकडील उत्पन्न दाखला) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात / संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किवा व्यवसाय करत नसावा.

5) विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहराच्या तालुक्याच्या ज्या ठिकाणी आहे अशा शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा. योजनेंतर्गत, तालुकास्तरावर लाभ मंजूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेतलेला असावा. या योजनेंतर्गत महिलांसाठी 30 टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय असेल.

अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

63 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आज उद्घाटन

63 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आज उद्घाटन   कोल्हापूर : स…