Home मनोरंजन बँकॉक ट्रिपचे नाव ऐकूनच हप्‍पू झाला व्‍यथित!

बँकॉक ट्रिपचे नाव ऐकूनच हप्‍पू झाला व्‍यथित!

2 min read
0
0
20

no images were found

बँकॉक ट्रिपचे नाव ऐकूनच हप्‍पू झाला व्‍यथित!

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’च्‍या आगामी एपिसोडमध्‍ये दरोगा हप्‍पू सिंग (योगेश त्रिपाठी) बँकॉकला जाणार आहे, पण त्‍याला मोठ्या संघर्षांचा सामना करावा लागतो. पत्‍नी राजेशला (गीतांजली मिश्रा) समजावण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये तो कटोरी अम्‍माला (हिमानी शिवपुरी) नाराज करतो. राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्‍हणाल्‍या, ”हप्‍पू राजेशकडे बँकॉकबाबत टिका करतो. दुसऱ्या दिवशी कमिशनर (किशोर भानुशाली) हप्‍पू आणि मनोहर (नितीन जाधव) यांना सांगतो की, त्‍यांना प्रशिक्षणासाठी बँकॉकला पाठवण्‍यात येत आहे आणि त्‍यांना प्रवासाला जाण्‍यापूर्वी त्‍यांच्‍या पत्‍नींकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) आणावे लागेल. हप्‍पूने आदल्‍या दिवशी राजेशकडे बँकॉकबाबत टिका केली असल्‍यामुळे तो चिंतित होतो.” हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्‍मा म्‍हणाल्‍या, ”मलायकाला (सोनल पनवार) एका एन्‍काऊंटरदरम्‍यान गोळी लागते आणि रक्‍तस्राव झाल्‍यामुळे डॉक्‍टर तिला रक्‍त वाढवणारे फूड सेवन करण्‍याचा सल्‍ला देतो. कटोरी अम्‍मा तिला ज्‍यूस देण्‍याला प्राधान्‍य देते, तर राजेश पौष्टिक पदार्थ देण्‍याचा आग्रह करते, ज्‍यामुळे दोघींमध्‍ये भांडण सुरू होते. कटोरी अम्‍मा आणि राजेश यांच्‍या प्रत्‍येक भांडणामध्‍ये हप्‍पू राजेशची बाजू घेतो, ज्‍यामुळे तिला आनंद होतो आणि अम्‍मा नाराज होते. पण, कमिशनर हप्‍पूला बँकॉक ट्रिपसाठी त्‍याच्‍या आईची एनओसी देखील सबमिट करण्‍याचा आदेश देतो. हप्‍पूला त्‍याच्‍या नाराज आईला समजावण्‍याबाबत तणाव येतो. कटोरी अम्‍माला आनंदी करण्‍यासाठी तो तिची बाजू घेऊ लागतो. मंदिरामध्‍ये ड्रामा अधिक प्रखर होतो, जेथे अम्‍मा व राजेश मनोहरच्‍या पत्‍नीला भेटतात, जी त्‍यांना बँकॉक ट्रिपसाठी एनओसी देण्‍याबाबत सांगते. राजेशला हप्‍पूचा संपूर्ण प्‍लॅन समजतो.” हप्‍पू या विलक्षण स्थितीमधून मार्ग काढू शकेल का? 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…