Home शासकीय महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये

महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये

2 second read
0
0
14

no images were found

महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये

 

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करण्यात येऊ नये. ज्या महाविद्यालयामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून फी आकारणी केली जाईल अशा महाविद्यालयांवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाविद्यालयाविरुध्द कारवाई करण्यात येईल. कोणत्याही महाविद्यालयाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या  शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये. तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…