
no images were found
नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने जपली सामाजिक जाणीव
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर आणि स्वामी समर्थ मंदिर तर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेगळे सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने जमा झालेल्या देणगीतून एक लाख रुपयांची ठेव जमा केली आहे. यातून शाळेस दर तीन महिन्यांने सातत्याने व्याज मिळत राहील अशी व्यवस्था मंदिर तर्फे करण्यात आली आहे. भाविकांकडून येणाऱ्या देणगीचे अंध शाळेस आर्थिक मदत देऊन योग्य प्रकारे नियोजन केले आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यासाठी श्रीदत्त भक्त मंडळाचे किरण रणदिवे, अतुल हासुरकर, विजय चव्हाण, गजानन शिंदे, जयसिंग राऊत, पुरुषोतम कुलकर्णी आदींनी व भक्तांनी परिश्रम घेतले आहे.श्रीदत्त भक्त मंडळातील या उपक्रमाचे भाविकांनी स्वागत केले आहे.