no images were found
सोनी सबच्या कलाकारांनी शेअर केल्या पावसाळ्यातील धमाल आठवणी
पावसाळा म्हटलं की जुन्या आठवणीत रममाण होणं, आनंदाचे क्षण… या काळात बालपणीच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. सोनी सबवरील लाडक्या कलाकारांसाठीदेखील पावसाळा खास आहे. पावसाविषयी त्यांच्या मनात काही अविस्मरणीय क्षण आणि हृदयस्पर्शी अनुभव आहेत. डबक्यात खेळण्यापासून ते घरात बनणारे पदार्थ.. प्रत्येक कलाकाराची वेगळी कहाणी आहे.
ध्रुव मालिकेत ताराची भूमिका करणारी रीया शर्मा म्हणते,‘’मला पावसाळा आवडतो. लाँग ड्राइव्हवर जात ते वातावरण, विशेषत: मुंबईतला पावसाळा एंजॉय करायला आवडतो. इथे खूप छान वातावरण असते. या काळात डेटवर जाणं तसेच चहा-पकोडा खायला आवडतं. पावसाळ्यात मी खास काही वेगळा ड्रेस घालत नाही. पण वातावणानुसार बूट घालते. पॅराशूट फॅब्रिकपासून बनलेले अनेक ड्रेसही मला आहेत. पावसाळ्यात ते बचाव करतात. हीच माझी नेहमीची मानसून फॅशन असते. मला पावसाचे वातावरण खूप आवडते. या काळात मला सकाळी उठावंही वाटत नाही. फक्त झोपून रहावं वाटतं..’’
बादल पे पांव है मालिकेत बानीचे पात्र साकारणारी अमनदीप सिधू म्हणते,“मी दिल्लीत होते तेव्हा, माझी आई खीर आणि पुरी करायची. ती माझी आवडती डीश होती. पावसाळ्यात या डिशच्या प्रत्येक घासाचा आनंद घेत मी वेळ घालवायचे. मुंबईत आल्यावर, बिझी झाले. धका-धकीच्या जीवनात माझी वडा-पावची आवड वाढली. बस स्टँडवर, विशेषत: पावसाळ्यात हा स्पाइसी स्नॅक्स खात मी वाट पहात असायचे. सध्या मी चंदीगडला आहे. दोन दिवसांपासून अखंड पाऊस सुरु आहे. यामुळे वातावरण खूप बदलले आहे. खूप ताजेतवाने वाटत आहे.”
वंशज मालिकेत युविकाची भूमिका साकारणारी अंजली तरारी म्हणते,“माझ्यासाठी पावसाळा खूप निवांत व आरामदायी असतो. या काळात मी नेहमी शॉर्ट्स किंवा पायजामा घालते. या वातावरणात मला साध्या सुखसोयींचा आनंद घ्यायला आवडते. बालपणीच्या आठवणी तर खूप खास आहेत. विशेषत: बर्फवृष्टी आणि अनपेक्षित सुट्या.. आम्ही भिजण्यासाठी आणि डबक्यात खेळण्यासाठी बाहेर जात असू.. अजूनही पावसाळ्याची जादू अनुभवायला मला खूप आवडते. पकोडा ही माझी या काळातही आवडती डिश. पकोडे खाताना जुने दिवस आठवतात. पावसाळ्यातची ती सर्वात परफेक्ट ट्रीट असायची…”