no images were found
कोल्हापुरात रंगणार “लोकनाथ चषक” भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध आरोग्य विषयक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबविले जाणार असून, मा.मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना कसबा बावडा विभाग आणि राजेश क्षीरसागर फौंडेशन यांच्या वतीने “लोकनाथ चषक” भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.६ ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पॅव्हेलियन ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे या क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना दि.११ फेब्रुवारी रोजी प्रकाश झोतात खेळविला जाणार आहे. या स्पर्धेकरिता विजेता संघास प्रथम पारितोषिक रोख रु.९९,९९९/- आणि “लोकनाथ चषक” दिला जाणार आहे. उपविजेता संघास रोख रु.४९,९९९/- आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी रु.९,९९९/- असे बक्षीस देण्यात येणार आहे. यासह मॅन ऑफ द सेरीज साठी “सायकल”, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजास “क्रिकेट बॅट”, उत्कृष्ट गोलंदाजास “स्पोर्ट्स शूज”, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास “क्रिकेट कीट”, अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी “स्मार्ट वॉच” सह सलग तीन षटकार, प्रथम हॅट्रिक साठी आकर्षक बक्षिसे अशी वैयक्तिक भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील प्रक्षेकांनाही आकर्षक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेकरिता इच्छुक संघांनी नावनोंदणी साठी शिवनेरी शिवसेना विभागीय संपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना शहर समन्वयक श्री.सुनील जाधव व शिवसेना विभाग कसबा बावडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रदर्शनीय सामन्यात “रेस्ट ऑफ महाराष्ट्र” विरुद्ध “कोल्हापूर स्टार” आमने सामने
या स्पर्धेअंतर्गत “रेस्ट ऑफ महाराष्ट्र” विरुद्ध “कोल्हापूर स्टार” या दोन संघांच्या मध्ये प्रदर्शनीय सामना खेळविण्यात येणार आहे. रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघामध्ये राज्यातील नामांकित खेळाडूंचा सहभाग असले तर कोल्हापूर स्टार संघात कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. दि.१० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.०० वाजता प्रकाशझोतात हा सामना खेळविण्यात येणार आहे. यामधील विजेत्या संघास रोख रु.२५ हजार बक्षीस दिले जाणार आहे.