
no images were found
परदेशी शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ
कोल्हापूर : राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 2024-25 करिता एकूण 75 विद्यार्थ्यांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 जून 2024 पर्यंत देण्यात आली होती. तथापि या योजनेस मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आणखी 15 दिवसांची म्हणजे 15जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती पुणे इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालकांनी दिली आहे.
योजनेच्या अर्जाचा नमुना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील रोजगार या लिंकवर आहे. पात्र विद्यार्थ्यांनी योजनेचा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे 15 जुलै 2024 रोजी सायं. 6.15 वाजेपर्यंत जमा करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.