no images were found
प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना 15 हजार रुपये दंड
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांच्या पथकांमार्फत तपासणी मोहिम व कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य विभागच्यावतीने लक्ष्मीपुरी परिसरात एकल वापर प्लास्टिकची तपासणी केली. यावेळी दत्त ट्रेडर्स, निरंकारी ट्रेडर्स व साई एजन्सी या व्यापाऱ्यांकडे प्लॅस्टीकचा साठा आढळून आला. त्यामुळे या तीन व्यापा-यांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे 15 हजार रुपये दंड करुन तो वसूल करण्यात आला. तसेच त्यांच्याकडुन 500 किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त-2 कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, ऋषीकेश सरनाईक, सुशांत कावडे, करण लाटवडे, सुशांत कांबळे, महेश भोसले, माधवी मसूरकर, गीता लखन, शुभांगी पोवार व मुकादम यांनी केली.
व्यापा-यांना व नागरीकांना सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर बंद करणेबाबत आवाहन
महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व नमूद आस्थापना व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.