no images were found
महापालिकेच्यावतीने आरोग्य सर्व्हेक्षण ५९८४ कंटेनरची तपासणी
कोल्हापूर ता.05 : महापालिकच्या आरोग्य विभागामार्फत डेग्यू, चिकनगुनिया व मलेरीया करीता दैनंदिन कंटेनर सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. शुक्रवारी ५९८४ कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये १९६६ कंटेनर मध्ये डेंग्यु डासाच्या अळया आढळून आल्या. हे सर्व्हेक्षण सरदार तालीम, फिरंगाई मंदीर, शिवाजीपेट, रजारामपुरी, यादवनगर, शाहू नगर, शाहूपुरी, मातंग यसाहत, दौलतनगर, जागृतीनगर, प्रतिभा नगर, सम्राटनगर, पांजरपोळ, पाटोळेवाडी, निंबाळकर मार्ग, न्यु शाहुपुरी, ताराबाई पार्क, कनाननगर, नाना पाटीलनगर, बोंद्रे नगर, आपटेनगर, वाशी नाका, दत्त चिले कॉलनी, रुईकर कॉलनी, माकडवाला वसाहत, टेंबलाईवाडी, टाकाळा, नेहरु नगर, सुभाष नगर, जवाहर नगर, नागाळा पार्क, शिवाजी पार्क या परिसरात करण्यात आले. यावेळी या भागामध्ये आशा सेविकांमार्फत जनजागृती करण्यात आली. यामध्ये नागरीकांनी स्वच्छ पाणी साठा आठवडयातून एकदा रिकामे करून तो कोरडा दिवस पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरीकांना सांगितले.
जुना बस डेपो कडील एम.ई.ओ.अधिकारी यांना साथरोग अधिनियम १८५७ अंतर्गत नोटीस
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क.५ कसबा बावडा यांच्या कार्यक्षेत्रातील पितळी गणपती जवळील जुने बसचे वर्कशॉप डेपो येथे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी या डेपोमध्ये डेग्यू, चिकन गुनियाच्या आळ्या व अंडी मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. त्यामुळे आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांच्या सुचनेनुसार जुना बस डेपो कडील एम.ई.ओ. अधिकारी यांना साथरोग अधिनियम १८५७ अंतर्गत नोटीस बजाविण्यात आली. तसेच आरोग्य विभागाकडून याकार्यक्षेत्रात औषध फवारणी व धूर फवारणीही करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पुलकीत खंबायते, डॉ. निखिल पाटिल, डॉ. आरती बिराजदार, समन्वयक नितिन जाधव, नागरी आरोग्य केंद्राकडील ए.एन. एम. दिपाली सातवेकर, मनिषा धनवडे, आशा स्वयंसेविका पल्लवी गवळी, दिपाली कोतलीकर, स्वाती बिरंगे व अस्मिता सतिश कांबळे, विनोद कांबळे, संदीप कर्ले प्रथमेश उपस्थित होते.