no images were found
अर्जित तनेजाचे सहकलाकार त्याला सेटवर ‘रॉकी रंधावा’ म्हणून संबोधतात!
झी टीव्हीवरील हल्लीच सुरू झालेली मालिका ‘कैसे मुझे तुम मिल गये’ ने सुरूवातीपासूनच दोन परस्परविरोधी व्यक्तिरेखा अमृता (सृती झा) आणि विराट (अर्जित तनेजा) यांच्यातील आपल्या अशक्यप्राय प्रेमकथेने प्रेक्षकांना गुंग केले आहे. डोळयांमध्ये लकाकी असलेल्या प्रणयी मनाची मराठी मुलगी जेव्हा सगळ्याच मुली ‘गोल्ड डिगर्स’ असतात असे समजून लग्नसंस्थेमध्ये न मानणाऱ्या डॅशिंग पंजाबी मुंड्याला भेटते तेव्हा काय होते ही ह्या मालिकेची मध्यवर्ती संकल्पना आहे.
ही मालिका प्रसारित व्हायला सुरूवात झाल्यापासून अर्जित तनेजा विराटच्या रूपात प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत असून त्याला त्याच्या ऐषारामी ‘दिल्ली बॉय’ लूकसाठी खूप प्रशंसा मिळत आहे. अर्जितचा जन्म आणि तो लहानाचा मोठाही दिल्लीमध्येच झाला असून तो मनाने एक पक्का पंजाबी मुंडाच आहे आणि प्रथमच टेलिव्हिजनवर त्याला स्वॅगी दिल्ली बॉयची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ह्या मालिकेत अर्जित स्टायलिश, उजळ रंगांच्या आणि बटणे उघडी असलेल्या शर्ट्समध्ये दिसत असून त्यातून त्याची पिळदार देहयष्टी ‘शो ऑफ’ करताना दिसून येत आहे. त्या शर्टांवर अंगाला घट्ट बसतील असे ब्लेझर्स आणि मस्त ॲक्सेसरीजसह त्याने आपला लूक पूर्ण केला आहे. त्याच्या ह्या लूकमध्ये सेटवर त्याचे सहकलाकार त्याला रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटातील रॉकी रंधावाच्या नावाने संबोधत आहेत.
अर्जित तनेजा म्हणाला, “आमच्या मालिकेला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे मी खूप थरारलो आहे. दिल्लीमध्ये एक पंजाबी मुलगा म्हणून मी वाढलो आणि आता मला अशाच प्रकारची भूमिका छोट्या पडद्यावर साकारण्याची संधी मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी मी नेहमीच उत्सुक राहिलेलो आहे आणि प्रत्येक भूमिकेचा योग्य लूक हा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. आमचे चाहते आणि प्रेक्षक यांना अतिशय आवडलेला असा ह्या शोमध्ये माझा लूक निर्माण करण्याचे श्रेय आमच्या क्रिएटिव्ह टीमला जाते. रोचक गोष्ट अशी की माझ्या सहकलाकारांना माझ्या आणि रॉकी रंधावाच्या लूकमध्ये साम्य दिसून आले आहे आणि ते मला अनेकदा मजेने सेटवर तशीच हाक मारतात. रॉकी तसा पश्चिम दिल्लीचा असल्याचे दाखवलेले असून विराट मात्र उत्तर दिल्लीचा आहे आणि हा सूक्ष्म फरक जाणून घेण्याची नजर फारच कमी लोकांना कळू शकेल. अर्थात रॉकीच्या एवढ्या लोकप्रिय व्यक्तिरेखेसोबत माझ्या व्यक्तिरेखेची तुलना होणे हीसुद्धा माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. (हसतो.)”
ह्या मालिकेतील लूकसाठी अर्जितला खूप प्रशंसा मिळत असून हे पाहणे प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरेल की काय अमृता हे सिद्ध करू शकेल की राजीव एक चांगला माणूस नाहीये आणि विराटची बहिण निमरितसाठी आयुष्याचा जोडीदार होण्याचा लायकीचा नक्कीच नाहीये. आपल्याला जे कळले ते विराटच्या दृष्टीस अमृता वेळेत आणू शकेल का?