no images were found
सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर :- पद्माराचे गर्ल्स हायस्कूल मधील कै लता देवी अनिल लोहिया चेस अकॅडमी मध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड व बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.
मुलींच्या गटात आज झालेल्या अंतिम पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित जयसिंगपूरच्या दिव्या पाटील व द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या दिशा पाटील या जुळ्या बहिणीने साडेचार गुणासह अपेक्षेप्रमाणे विजेते व उपविजेतेपद राखले.संस्कृती सुतार नांदणी, सिद्धी बुबणे नांदणी,व्रिधी गायकवाड कोल्हापूर व जुई चोरगे कोल्हापूर या चौघीणी तीन गुणांसह टायब्रेक गुणानुसार अनुक्रमे तिसरे, चौथे,पाचवे व सहावे स्थान मिळविले.
मुलांच्या गटात आज झालेल्या अंतीम सहाव्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकर ने सहापैकी सहा गुण मिळवून अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकाविले.तृतीय मानांकित जांभळी चा अभय भोसले, पाचवा मनांकित कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकर,सातवा मानांकित गडहिंग्लजचा स्वरुप साळवे व अकरावा मानांकित कोल्हापूरचा अरीन कुलकर्णी या चौघांचे समान पाच गुण झाले होते.सरस बकोल्झ 21 टायब्रेक गुणानुसार पाचवा मानांकित कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकर उपविजेता ठरला तर अभय भोसले जांभळी 20.5 , अरिन कुलकर्णी कोल्हापूर 18.5 व स्वरुप साळवे गडहिंग्लज, 17.5 यांना अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या व पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धा महालक्ष्मी हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश पाटील व दीपा पाटील यांनी पुरस्कृत केल्या होत्या, व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीचे,ही विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ शरद पाटील, धीरज वैद्य, प्रिया देशपांडे (नृत्य अलंकार), प्रियांका ढोले, अर्पिता दिवाण, उत्कर्ष लोमटे,मनीष मारूलकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, अमित दिवाण व रवी आंबेकर उपस्थित होते…
सहा ते आठ जुलै दरम्यान कांदिवली मुंबई येथे होणाऱ्या 17 वर्षाखालील मुला मुलींच्या राज्य निवड आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला कोल्हापूरचा संघ पुढीलप्रमाणे
मुले :- ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर व अर्णव पोर्लेकर कोल्हापूर
मुली:- दिव्या पाटील जयसिंगपूर व दिशा पाटील जयसिंगपूर
उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे
पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
मुले:- 1) अरिन कुलकर्णी कोल्हापूर 2) स्वरूप साळवे गडहिंग्लज मुली :- 1) व्रिधी गायकवाड कोल्हापूर 2) अर्पिता पाटील कोल्हापूर
तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
मुले:- 1) अभय भोसले जांभळे 2) सर्वेश पोतदार कोल्हापूर मुली :- 1) संस्कृती सुतार नांदणी 2) सिद्धी बुबणे नांदणी
अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
मुले:- 1) शौर्य बगाडिया इचलकरंजी 2) आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी मुली :- 1) सिद्धी कर्वे जयसिंगपूर 2) निधी गायकवाड कोल्हापूर
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
मुले:- 1) अवनीश जितकर कोल्हापूर 2) दिविज कथ्रूट कोल्हापूर मुली :- 1) श्रावणी पाटुकले कोल्हापूर
सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
मुले:- 1) अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर 2) अथर्वराज ढोले कोल्हापूर