Home मनोरंजन एण्‍ड टीव्‍ही कलाकारांनी जुन्‍या कपड्यांपासून बनवल्‍या स्‍टायलिश, इको-फ्रेण्‍डली बॅग्‍ज!

एण्‍ड टीव्‍ही कलाकारांनी जुन्‍या कपड्यांपासून बनवल्‍या स्‍टायलिश, इको-फ्रेण्‍डली बॅग्‍ज!

3 min read
0
0
27

no images were found

एण्‍ड टीव्‍ही कलाकारांनी जुन्‍या कपड्यांपासून बनवल्‍या स्‍टायलिश, इको-फ्रेण्‍डली बॅग्‍ज!

दरवर्षी पर्यावरणावर सिंगल-युज प्‍लास्टिक बॅग्‍जच्‍या प्रतिकूल परिणामांबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यासाठी इंटरनॅशनल प्‍लास्टिक बॅग फ्री डे साजरा केला जातो. हा दिवस जगभरात व्‍यक्‍ती, समुदाय व व्‍यवसायांना प्‍लास्टिक बॅग्‍जचा वापर कमी करण्‍याचे आवाहन करतो. अनेकांनी या उपक्रमाला अंगिकारत पर्यायी वस्‍तूंचा वापर सुरू केला आहे, तसेच रिसायकलिंग प्रयत्‍नांना पाठिंबा देखील दिला आहे. यामध्‍ये एण्‍ड टीव्‍ही कलाकारांचा समावेश आहे, ज्‍यांनी जुन्‍या कपड्यांना रिसायकल करून बॅग्‍ज बनवल्‍या आहेत आणि कार्बनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करण्‍यास मदत केली आहे. हे कलाकार आहेत प्रचिती अहिरराव (विमला बिहारी वाजपेयी, ‘अटल’), हिमानी शिवपुरी (कटोरी अम्‍मा, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘अटल’मधील विमला बि‍हारी वाजपेयीच्‍या भूमिकेसाठी लोकप्रिय असलेल्‍या प्रचिती अहिरराव म्‍हणाल्‍या, ”सिंगल-युज प्‍लास्टिकमुळे आपल्‍या पर्यावरणाच्‍या होत असलेल्‍या नुकसानांबाबत सर्वांनी जागरूक राहण्‍याची वेळ आली आहे. मी खूप वर्षांपूर्वी प्‍लास्टिक बॅग्‍जचा वापर करणे थांबवले. आपण दैनंदिन कामांसाठी प्‍लास्टिक बॅग्‍जवर अवलंबून असलो तरी अनेक पर्याय देखील उपलब्‍ध आहेत. जगाचे संरक्षण करायचे असले तर रिसायकलिंग व अपसायकलिंग महत्त्वाचे आहे. मी माझ्या रोजच्‍या गरजांसाठी जुन्‍या कपड्यांपासून बनवलेल्‍या बॅग्‍जचा वापर करते. बाजारामध्‍ये अनेक कापडी पिशव्‍या उपलब्‍ध असल्‍या तरी मी माझ्या जुन्‍या कपड्यांपासून बनवलेल्‍या बॅग्‍ज वापरण्‍याला प्राधान्‍य देते. माझा कलेच्‍या परिवर्तनात्‍मक क्षमतेवर विश्‍वास आहे. मी माझ्या जुन्‍या कपड्यांपासून फॅशनेबल, उपयुक्‍त बॅग्‍ज बनवल्‍या आहेत, तसेच जुन्‍या, विणलेल्‍या मफलर्स व स्‍वेटर्समधील धाग्‍यांपासून लहान कॅरी बॅग्‍ज बनवल्‍या आहेत. माझी मैत्रिण जुन्‍या वस्‍तूंपासून स्‍टायलिश बॅग्‍ज बनवणारा ब्रँड चालवते. मला काहीतरी फॅशनेबल करायचे असल्‍यास मी त्‍या बॅग्‍जचा वापर करते. मी अनेक मैत्रिणींना व सह-कलाकारांना या बॅग्‍ज दिल्‍या आहेत आणि त्‍यांना बॅग्‍ज आवडल्‍या आहेत. अनेकांनी मोठ्या ब्रँड्सकडून खरेदी करणे थांबवत या इको-फ्रेण्‍डली पर्यायांचा अवलंब केला आहे. आज, मी सर्वांना प्‍लास्टिक बॅग्‍जचा वापर थांबवण्‍याची आणि अपसायकल केलेल्‍या साहित्‍याचा अवलंब करण्‍याची शिफारस करते.”

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्‍मा म्‍हणाल्‍या, ”मी पर्यावरणवरील प्रतिकूल परिणामांमुळे प्‍लास्टिकचा वापर करत नाही. त्‍याऐवजी, मी घरामध्‍ये व बाहेरील वापरासाठी माझ्या जुन्‍या साड्या व इतर कपड्यांपासून बनवलेल्‍या रियुजेबल बॅग्‍जचा वापर करते. मी नेहमी माझ्या कारमध्‍ये कापडी व तागाच्‍या पिशव्‍या ठेवते, ज्‍यामुळे कधीही त्‍यांचा वापर करता येतो. मी विचारशील निर्णय घेते, जे माझ्या तत्त्‍वांशी निगडित असतात आणि इतरांना रिसायकल केलेल्‍या वस्‍तूंची आकर्षकता व कार्यक्षमतेची प्रशंसा करण्‍यास प्रेरित करतात. जुन्‍या वस्‍तूंना व्‍यावहारिक वस्‍तूंमध्‍ये बदलत आपण जगामध्‍ये सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणू शकतो.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबीम्‍हणाल्‍या, ”मी शिफारस करते की, प्रत्‍येकाने प्‍लास्टिकऐवजी पर्यावरणास अनुकूल पर्याय जसे कागदी पिशव्‍या, कापडी पिशव्‍या किंवा अपसायकल केलेल्‍या साहित्‍यापासून तयार केलेल्‍या बॅग्‍जचा वापर करण्‍याचा विचार केला पाहिजे. अपसायकलिंगमध्‍ये जुन्‍या वस्‍तूंना नवीन व आकर्षक वस्‍तूंमध्‍ये बदलता येते. उदाहरणार्थ, मी माझ्या आईच्‍या जुन्‍या साड्यांपासून स्‍टायलिश बॅग्‍ज बनवल्‍या आहेत. मी विविध प्रसंगांसाठी त्‍यांचा अभिमानाने वापर करते. तसेच, एका प्रतिभावान मैत्रिणीने मला तागाच्‍या व जुन्‍या कॉटन धाग्यांपासून बनवलेली आकर्षक हँडबॅग भेट दिली, ज्‍यामधून अपसायकल केलेल्‍या उत्‍पादनांची आकर्षकता दिसून येते. मी इतरांना देखील जुन्‍या वस्‍तूंना महत्त्व देण्‍यास आणि शाश्‍वत पर्यावरणीय निवडी करण्‍यास प्रेरित करते.”     

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…