Home मनोरंजन योगेश त्रिपाठी यांच्‍या कार कलेक्‍शनमध्‍ये तिसऱ्या कारची भर! 

योगेश त्रिपाठी यांच्‍या कार कलेक्‍शनमध्‍ये तिसऱ्या कारची भर! 

1 min read
0
0
22

no images were found

योगेश त्रिपाठी यांच्‍या कार कलेक्‍शनमध्‍ये तिसऱ्या कारची भर! 

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील दरोगा हप्‍पू सिंगच्‍या भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेले योगेश त्रिपाठीयांनी नुकतीच आपल्‍या कार कलेक्‍शनमध्‍ये तिसऱ्या कारची भर केली आहे. सर्वोत्तम विनोदीशैली आणि लक्षवेधक परफॉर्मन्‍ससह योगेश टेलिव्हिजनवर लोकप्रिय ठरले आहेत, ते त्‍यांच्‍या भूमिकेची विलक्षण मोहकता व अद्वितीय शैलीसह प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. नुकतेच, अभिनेत्‍याने फिअरलेस डार्क एडिशन एसयूव्‍ही खरेदी केली. त्‍यांच्‍या ताफ्यामधील ही नवीन कार त्‍यांच्‍यासाठी व त्‍यांच्‍या कुटुंबासाठी संस्‍मरणीय क्षण आणि महत्त्वपूर्ण संपादन आहे. योगेश त्रिपाठी आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, “तुमच्‍यापैकी बहुतेकांना माहित आहे की मला कार खूप आवडतात. याच आवडीमुळे मी तिसरी कार खरेदी केली आहे, जिचे माझ्या मनात खास स्‍थान आहे. माझ्या कलेक्‍शनमधील ही तिसरी कार माझ्या मुलासाठी हृदयस्‍पर्शी भेट आहे. त्‍याची दीर्घकाळापासून ब्‍लॅक कार खरेदी करण्‍याची इच्‍छा होती, म्‍हणून मी डार्क एडिशन एसयूव्‍ही खरेदी केली. पहिल्‍यांदा ही कार पाहिल्‍यानंतर त्‍याच्‍या चेहऱ्यावरील आनंद बहुमूल्‍य होता. ब्‍लॅक रंगामधून अत्‍याधुनिकता व क्षमता दिसून येते आणि हा रंग माझा आवडता आहे. यासारखे क्षण जीवनात उत्‍साहाची भर करतात, ज्‍यामधून यशस्‍वी झाल्‍याची भावना मिळते. आम्‍ही या कारमधून रोड ट्रिपवर जाणार आहोत. आम्‍ही अजून स्‍थळ ठरवलेले नाही, पण पुढील ट्रिपचे नियोजन करण्‍याबाबत उत्‍साह निर्माण झाला आहे. प्रत्‍येकजण त्‍या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे.” 

योगेश त्रिपाठी आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांनी ‘डार्क एडिशन’ थीमशी जुळणारे ब्‍लॅक आऊटफिट्स परिधान करत आणि लहान पूजा करत नवीन कारच्‍या आगमनाचा आनंद साजरा केला. नवीन कारमध्‍ये बसून घराकडे येत असताना त्‍यांनी खूप धमाल केली, ज्‍यामधून या नवीन कारने त्‍यांच्‍या जीवनात आणलेला आनंद दिसून आला. योगेश या नवीन कारबाबत खूप आनंदित आहेत, तसेच त्‍यांनी त्‍यांची मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील कुटुंब व प्रेक्षकांसोबत देखील हा आनंद शेअर केला. ते त्‍यांच्‍या नवीन कारमध्‍ये एकत्रित अनेक आठवणी तयार करण्‍यास, सामुदायिक भावना व एकत्रित उत्‍साहाचा आनंद घेण्‍यास उत्‍सुक आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…